IAS Transfer: प्रशासकीय फेरबदल! मध्यरात्री 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाच जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी

या धडक निर्णयात महत्त्वाच्या विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त आणि पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

IAS Transfer: प्रशासकीय फेरबदल! मध्यरात्री 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाच जिल्ह्यांना मिळाले नवे जिल्हाधिकारी

14 IAS Officers Transferred Midnight : राज्य प्रशासनात अचानक मोठा फेरबदल घडवून आणत मध्यरात्री वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार तब्बल 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही सनदी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या धडक निर्णयात महत्त्वाच्या विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त आणि पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय बिहार राज्यात घेण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नव्या विभागांची व अतिरिक्त जबाबदारी
प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय आणि गती आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत:
– 1995 बॅचचे आयएएस अधिकारी अरविंद कुमार चौधरी (अपर मुख्य सचिव, मंत्रिमंडळ सचिवालाय) यांच्याकडे पाटणा येथील विपार्डचा (BIPARD) अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
– 1996 बॅचचे आयएएस अधिकारी एच. आर. श्रीनिवास यांची ग्रामीण विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागातील चौकशी आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार राहील.
– राजेश कुमार यांची पाटणा विभागाच्या आयुक्तपदी, तर विनय कुमार यांची वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
– मयंक बडवडे यांच्याकडे निगराणी विभागाच्या प्रधान सचिवपदाची तर मुख्यमंत्र्यांचे सचिव संजय सिंह यांच्याकडे उत्पादन, मद्यनिषेध आणि नोंदणी विभागाच्या सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
– जलसंपदा विभागाचे सचिव चंद्रशेखर सिंह यांच्याकडे लघु जलसंपदा विभागाचा, नवदीप शुक्ला यांच्याकडे बिहार शिक्षण प्रकल्प परिषदेच्या संचालकपदाचा, विनोद सिंह गुंजियाल यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा तर उच्च शिक्षण सचिव रौशन यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

हेही वाचा – Tukaram Mundhe : पुण्यातील डेअरीवरील कारवाई FDAला भोवली? हायकोर्टाने ठोठावली 5 लाखांची नुकसानभरपाई

पाच जिल्ह्यांमध्ये नवे जिल्हाधिकारी नियुक्त
या मोठ्या फेरबदलांतर्गत प्रशासकीय कारभाराला गती देण्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे:

– सिवान: नगरविकास विभागाचे अपर सचिव असलेले विजय प्रकाश मीणा यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
– भोजपूर: खाण संचालक म्हणून कार्यरत असलेले मनेश कुमार मीणा आता जिल्ह्याची धुरा सांभाळतील.
– बेगूसराय: रिची पांडेय यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
– सीतामढी: तनय सुल्तानिया यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी.
– कैमूर: अनुराग कुमार यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

फेरबदलांमुळे प्रशासनाला नवी गती मिळण्याची अपेक्षा
याशिवाय कार्तिकेय धनजी यांच्याकडे पीएचडी विभागाच्या सचिवपदाची धुरा देण्यात आली आहे, तर नवीन कुमार यांना मद्यनिषेध विभागाच्या अतिरिक्त पदभारातून आणि विनोद सिंह गुंजियाल यांना शिक्षण विभागाच्या पदभारातून मुक्त करण्यात आले आहे. मध्यरात्री झालेल्या या तडकाफडकी बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या फेरबदलांमुळे विविध जिल्ह्यांसह सरकारी विभागांच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणि गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Job Scam : सरकारी नोकरीच्या नावाखाली 2.9 कोटींचा गंडा; मोठ्या व्यावसायिकाच्या फडवणुकीने खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number