Punjab National Bank : पीएनबीला 2434 कोटींचा चुना! कशी झाली इतक्या मोठ्या रकमेची अफरातफर?

बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या नवीन घोटाळ्यांची माहिती शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अधिकृतपणे देण्यात आली. याचा परिणाम बँकेच्या शेअर्सवर होण्याची मोठी शक्यता आहे.

Punjab National Bank : पीएनबीला 2434 कोटींचा चुना! कशी झाली इतक्या मोठ्या रकमेची अफरातफर?

Punjab National Bank Fraud : पंजाब नॅशनल बँकेतून (PNB) पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची अफरातफर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या नवीन घोटाळ्यांची माहिती शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अधिकृतपणे देण्यात आली. दोन मोठ्या मिळून कंपन्यांनी बँकेला हजारो कोटींचा चुना लावला असून याचे पडसाद शेअर बाजारावर उमटण्याची दाट शक्यता आहे.

कोणी आणि कसा केला घोटाळा?
पंजाब नॅशनल बँकेने नियामक फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'श्रेई' (SREI) समूहाच्या दोन कंपन्या या महाघोटाळ्याला जबाबदार आहेत. यामध्ये SREI Equipment Finance Limited (SEFL) ने 1,240.94 कोटी रुपये आणि SREI Infrastructure Finance Limited (SIFL) ने 1,193.06 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते, मात्र त्याची परतफेड केली नाही. या प्रकरणाची रीतसर माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) देण्यात आली आहे.

बँकेने केली 100 टक्के तरतूद (Provisioning)
जरी फसवणुकीची रक्कम मोठी असली, तरी पीएनबीने स्पष्ट केले आहे की, त्यांनी या दोन्ही कर्जांच्या थकबाकीसाठी 100 टक्के प्रोव्हिजनिंग (तरतूद) पूर्ण केली आहे. म्हणजेच या तोट्याचा बँकेच्या भविष्यातील ताळेबंदावर अचानक मोठा परिणाम होणार नाही. या कंपन्यांचे प्रकरण सध्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) कडे असून, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत या प्रकरणाचा निकाल लावला जात असल्याचेही बँकेने नमूद केले आहे.

हेही वाचा – India New Zealand Trade: "आम्ही दिलेलं वचन पाळलं!" न्यूझीलंडच्या पंतप्रधानांकडून भारतासोबतच्या कराराचं कौतुक; म्हणाले…

शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
शुक्रवारी बाजार बंद होताना पीएनबीचा शेअर 0.50 टक्क्यांनी घसरून 120.35 रुपयांवर स्थिरावला होता. मात्र, 2434 कोटींच्या फ्रॉडची बातमी समोर आल्यामुळे सोमवारी शेअरच्या किमतीवर दबाव निर्माण होऊ शकतो. तांत्रिक आकडेवारीनुसार, शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) सध्या 50.8 वर आहे, तर मनी फ्लो इंडेक्स 55.4 वर आहे. यावरून हा शेअर सध्या 'न्यूट्रल झोन' मध्ये असल्याचे समजते. 2025 या वर्षात या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा दिला आहे.

गुंतवणूकदारांसाठी सतर्कतेचा इशारा
गेल्या सहा महिन्यांत पीएनबीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. सोमवारी बाजार उघडल्यानंतर गुंतवणूकदार या बातमीवर कशी प्रतिक्रिया देतात, यावर बँकेच्या शेअर्सची पुढील दिशा ठरणार आहे.

हेही वाचा – Income Tax Update: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर विभागाने ई-फाइलिंग पोर्टलमध्ये केला 'हा' मोठा बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number