Petrol Diesel Price Today: सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अर्थकारणावर आणि खिशावर थेट परिणाम करणारा घटक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर. इंधनाच्या किमतीत थोडीजरी वाढ झाली तरी त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, अन्नधान्य आणि वाहतूक खर्चावर होतो, ज्यामुळे महागाई वाढते. त्यामुळे दररोज सकाळी जाहीर होणाऱ्या इंधन दरांकडे नागरिकांचे बारीक लक्ष लागलेले असते. आज, गुरुवार 27 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर अपडेट केले आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवीन दर
भारतीय तेल कंपन्या जसे की इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्याकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे सुधारित दर जारी केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य, वाहतूक खर्च आणि स्थानिक कर रचना या सर्व घटकांचा विचार करून हे दर ठरवले जातात. स्थानिक करांमधील फरकामुळेच प्रत्येक शहरात इंधनाच्या किमतींमध्ये तफावत दिसून येते. आज महाराष्ट्रातील विविध भागांत इंधनाचे दर स्थिर ते काहीसे घसरलेले पाहायला मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर (प्रति लिटर)
वाहनांमध्ये इंधन भरण्यापूर्वी आपल्या शहरातील आजचे दर जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांतील दर खालीलप्रमाणे आहेत:
– मुंबई शहर: पेट्रोल 111.21 रुपये, डिझेल 97.83 रुपये
– पुणे: पेट्रोल 112.04 रुपये, डिझेल 98.68 रुपये
– ठाणे: पेट्रोल 107.98 रुपये, डिझेल 94.47 रुपये
– नाशिक: पेट्रोल 112.44 रुपये, डिझेल 99.07 रुपये
– नागपूर: पेट्रोल 111.80 रुपये, डिझेल 98.48 रुपये
– छत्रपती संभाजीनगर: पेट्रोल 111.03 रुपये, डिझेल 96.99 रुपये
– कोल्हापूर: पेट्रोल 108.94 रुपये, डिझेल 95.47 रुपये
– यवतमाळ: पेट्रोल 104.18 रुपये, डिझेल 94.76 रुपये
हेही वाचा – लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! 1 सप्टेंबरपासून खात्यात दरमहा जमा होणार 2500 रुपये
इतर जिल्ह्यांमधील इंधनाचे ताजे भाव
याव्यतिरिक्त अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 108.11 रुपये आणि डिझेल 94.78 रुपये, अमरावतीमध्ये पेट्रोल 109.55 रुपये आणि डिझेल 96.08 रुपये, तर सातारामध्ये पेट्रोल 108.77 रुपये आणि डिझेल 95.30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोलचा भाव 108.89 रुपये आणि डिझेलचा भाव 95.42 रुपये आहे. धाराशिवमध्ये पेट्रोल 108.93 रुपये व डिझेल 95.46 रुपये, तर पालघरमध्ये पेट्रोल 108.66 रुपये आणि डिझेल 98.89 रुपये प्रति लिटर नोंदवले गेले आहे.
एसएमएसद्वारे घरबसल्या तपासा तुमच्या शहरातील दर
मोबाईलवरून एका एसएमएसद्वारे सहजपणे तुमच्या शहरातील इंधनाचे दर मिळवणे शक्य आहे. इंडियन ऑइलच्या (IOC) ग्राहकांनी RSP <डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर संदेश पाठवावा. बीपीसीएलच्या (BPCL) ग्राहकांनी RSP <डीलर कोड> लिहून 9223112222 वर, तर एचपीसीएलच्या (HPCL) ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास ताजे दर मोबाईलवर प्राप्त होतात.
हेही वाचा – 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाराऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या घडामोडी; किती वाढणार पगार? वाचा सविस्तर