LPG वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का! सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; आता इतक्या दिवसांनीच मिळणार सिलिंडर

गॅस कंपन्यांनी LPG सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियम लागू केले असून आता ग्राहकांना ठराविक दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

LPG वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का! सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; आता इतक्या दिवसांनीच मिळणार सिलिंडर

LPG Cylinder Booking Rules: देशात सध्या इंधन पुरवठ्याशी संबंधित परिस्थिती तणावपूर्ण होत चालली असून त्याचा परिणाम घरगुती LPG गॅसवरही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असून ग्राहकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गॅस कंपन्यांनी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

नवीन नियमानुसार, ग्राहकांना आता ठराविक कालावधी पूर्ण होईपर्यंत पुढील सिलिंडरसाठी बुकिंग करता येणार नाही. विशेषतः 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले आहे. डबल सिलिंडर कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान 35 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याआधी ही मर्यादा 25 दिवसांची होती.

हेही वाचा:Land Rules : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता जमिनीची मोजणी आणि पोटहिस्से होणार अवघ्या 200 रुपयांत; पाहा नवीन नियम

गॅसची साठेबाजी रोखणे आणि सर्व ग्राहकांना वेळेवर पुरवठा मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या मागणीमुळे आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे कंपन्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

वेगवेगळ्या ग्राहक गटांसाठी वेगवेगळे नियम लागू करण्यात आले आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ग्राहकांना पुढील बुकिंगसाठी तब्बल 45 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. तसेच, ग्रामीण भागातील ग्राहकांसाठीही हेच नियम लागू करण्यात आले असून त्यांनाही ४५ दिवसांचे अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्यांच्याकडे सिंगल सिलिंडर कनेक्शन आहे, ते ग्राहक डिलिव्हरीनंतर 25 दिवसांनी पुन्हा बुकिंग करू शकतात. मात्र, यामध्येही स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे.

नवीन नियमांनुसार, गॅस डिलिव्हरीच्या वेळी ओटीपी सांगणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या ग्राहकांना बुकिंग किंवा डिलिव्हरीमध्ये अडचणी येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये बुकिंग रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Mahadbt Portal Issue: डिजिटल इंडियाचा बोजवारा? महाडीबीटी पोर्टल 'हँग'; कृषी यांत्रिकीकरणाचे हजारो अर्ज लालफितीत अडकले

याशिवाय, एका वर्षात मिळणाऱ्या 12 सबसिडी सिलिंडरचा कोटा पूर्ण झाल्यास अतिरिक्त सिलिंडरसाठी वेगळी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. १३वा सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना गॅस कंपनीच्या ॲपवर जाऊन काही आवश्यक माहिती भरावी लागेल. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, विशेष प्रसंग किंवा अतिरिक्त गरज याबाबत माहिती द्यावी लागेल. यानंतरच कंपनी अतिरिक्त सिलिंडर देण्याचा निर्णय घेईल.

गॅस सिलिंडरच्या बुकिंगमधील बदलांमुळे ग्राहकांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. मात्र, यामुळे पुरवठा व्यवस्थापन सुधारेल आणि सर्वांना गॅस उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या नव्या नियमांची माहिती घेऊन नियोजनपूर्वक गॅसचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number