Jaggery Price Hike : सणासुदीच्या काळात सामान्यांचे हाल! साखर महागली, आता गुळानेही वाढवली चिंता; एका किलोसाठी लागणार…

गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशातच साखरपाठोपाठ गुळाचे दर वाढले आहेत.

Jaggery Price Hike : सणासुदीच्या काळात सामान्यांचे हाल! साखर महागली, आता गुळानेही वाढवली चिंता; एका किलोसाठी लागणार…

सणासुदीच्या दिवसांत घराघरात गोडधोड पदार्थांची तयारी सुरू असतानाच साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या बजेटची चिंता वाढवली आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशातच साखरपाठोपाठ गुळाचे दर वाढल्यामुळे याचा फटका आता गुळावर आधारित उद्योग क्षेत्राला बसला आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! साखरेच्या दरात मोठी घसरण; क्विंटलमागे तब्बल 700 ते 800 रुपयांची कपात

गुळाचे भाव हे 70 ते 80 रुपयांवर गेल्यामुळे उद्योजकांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे. गुळाचे कुठलेही दर निश्चित नसल्यामुळे त्याचा उद्योगांना फटका बसत आहे. कुठेतरी वाढत्या दरावर सरकारने नियंत्रण आणावे अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. गुळाचे दर वाढल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या नवीन ऑर्डर घेत नाही जुन्या ऑर्डर्स मध्येच काम करत आहे.

कारण वाढत्या भावामुळे आम्हाला नवीन ऑर्डर घेणे परवडणार नाही. नवीन दराने मालाची ऑर्डर घेणे आम्हाला परवडणारे नाही. गुळाचे दर राज्य सरकारने नियंत्रणात आणले नाही तर आम्हाला उद्योगधंदे बंद करण्याची वेळ येणार. अशी माहिती उद्योजक अनिल सावंत यांनी दिली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी आढावा घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number