FDA Raid In Beed : पांढराशुभ्र दिसणारा तो पनीर नव्हे, तर ‘स्लो पॉयझन’! अन्न औषध प्रशासनाच्या धाडीत खळबळजनक प्रकार समोर

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बीडच्या शिरुर तालुक्यात टाकलेल्या धाडीत खवा, पनीर या पदार्थात सॅफोलाईट केमिकलची भेसळ केल्याचे उघड केलं आहे.

FDA Raid In Beed :  पांढराशुभ्र दिसणारा  तो पनीर नव्हे, तर ‘स्लो पॉयझन’! अन्न औषध प्रशासनाच्या धाडीत खळबळजनक प्रकार समोर

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बीडच्या शिरुर तालुक्यातील दहीवंडी येथे टाकलेल्या धाडीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दहीवंडी येथील जय श्री कृष्णा केक ॲन्ड बफरी या उत्पादन केंद्रात कारवाई केली असता त्या ठिकाणी खवा, पनीर हे चमकदार होण्यासाठी घातक अशा सॅफोलाईटची भेसळ केली जात होती.

या ठिकाणाहून तब्बल 35 हजार 536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी व अन्य अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत शिरुर पोलिस ठाण्यात मालक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासणीत जप्त करण्यात आलेला 35 हजार 536 रुपयांचा मिठाई व कच्च्या मालाचा साठा कमी दर्जाचा, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तसेच अस्वच्छ व अयोग्य साठवणुकीमुळे नाशवंत असल्याने घटनास्थळीच खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला. याशिवाय व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number