Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro आणि Pro Max ची प्री-ऑर्डर सुरू; किंमत ऐकून व्हाल थक्क

मोबाईल म्हटलं की अनेक देशांमध्ये अॅपल या ब्रँडची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. महागडा आणि आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या अॅपलच्या नव्या आयफोनची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता बऱ्याचजणांना

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro आणि Pro Max ची प्री-ऑर्डर सुरू; किंमत ऐकून व्हाल थक्क

मोबाईल म्हटलं की अनेक देशांमध्ये अॅपल या ब्रँडची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. महागडा आणि आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या अॅपलच्या नव्या आयफोनची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता बऱ्याचजणांना होती. अखेर आता ग्राहकांना या नव्या आयफोनचे बुकिंग करता येणार आहे. नेमके बुकिंग कधीपासून सुरु होणार, फोनची किंमत किती असेल आणि ग्राहकांना कोणते पर्याय मिळणार, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
अॅपलच्या नव्या  iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची वाट पाहणाऱ्या असंख्य ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोन्ही फोनची भारतातील प्री-ऑर्डर ही आज, 12 सप्टेंबरपासून सुरु होईल. विशेष म्हणजे नवीन आयफोन खरेदी करताना ग्राहकांना त्यांच्या आवडीचा रंग आणि स्टोरेज पर्याय देखील निवडता येणार आहे.  तर  Pro Max हे मॉडेल घेण्याचा विचार असलेल्या ग्राहकांनी मात्र बुकिंगच्या वेळी लवकर निर्णय घेणे हे फायद्याचे ठरणार आहे. 

हेही वाचा-D Mart Ganeshotsav Offers: गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी खुशखबर! आता गृहपयोगी वस्तूंची खरेदी होणार स्वस्त दरात, Dmart ची नवीन संकल्पना जाणून घ्या..

ग्राहकांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्री-ऑर्डर अॅपलच्या ऑनलाइन स्टोर आणि apple store या अॅपवर करता येणार आहे. यासोबतच अॅमेझॉन, फ्लिपकार्डस, विजय सेल्स यांसारख्या असलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडूनही तुम्ही तुमच्या आवडीचा फोन बुक करु शकता. शिवाय ऑफलाइन खरेदी करु इच्छिणारे ग्राहक हे अॅपल स्टोअर किंवा अधिकृत असलेल्या जवळच्या स्टोरमध्ये जाऊन मोबाईलची उपलब्धता तपासू शकता.

जाणून घ्या मोबाईलच्या किंमती?
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत ही तब्बल 1,64,900 रुपये आहे. तर iPhone 18 Pro Max या मोबाईलची सुरुवात 1,79,900 रुपयांपासून होणार आहे. या दोन्ही फोनमध्ये ग्राहकांना  256GB, 512GB, 1TB आणि 2TB स्टोरेज पर्याय उपलब्ध असलेले पाहायला मिळतील.  Phone 18 Pro च्या 512GB मॉडेलची किंमत ही जवळपास 1,89,900 रुपये आणि 2TB ची किंमत ही 3,14,900 रुपये आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number