राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक लागली आहे. ही पोटनिवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, दादांच्या मृत्यूनंतरची सहानुभूती आणि पवारांचा बालेकिल्ला असल्यामुळे सुनेत्रावहिनींसाठी बारामतीची निवडणूक सोपी मानली जात आहे. परंतू काँग्रेसने उतरवलेल्या उमेदवारामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच पाठोपाठ राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोगमध्येही पोटनिवडणूक लागली आहे.
बीडमधील गाजलेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला दीड वर्ष उलटले असून, आता मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकी निमित्ताने हे गाव पुन्हा चर्चेत आलं आहे. दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं.मस्साजोगच्या ग्रामपंचायतीचं बिजुल वाजलंय. सरपंच देशमुखांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी देशमुखांची पत्नी माजी सरपंच अश्विनी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
माजी सरपंच संतोष देशमुखांची गेल्या दीड वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती, त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. बीडमधील अनेक तालुक्यांमुळे दहशतीचे वातावरण तयार झाले होते, देशमुखांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. अनेक मराठा संघटना एकत्र येऊन जागोजागी देशमुखांच्या हत्येचे आरोपी पकडण्यासाठी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले होते. आरोप प्रामुख्याने धनंजय मुंडेंच्या विश्वासू मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड सह आठ जणांवर कारवाई करण्यात आली. तथापि कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा तपस सुरु आहे.
असा राहिला आहे अश्विनी देशमुखांचा राजकीय प्रवास
देशमुकांच्या पत्नी आधी सुद्धा सरपंच राहिल्या आहेत. अश्विनी २०१७ ते २०२२ ह्या काळात मस्साजोगच्या सरपंच राहिल्या आहेत. प्रामुख्याने पतीची मदत आणि भाजपची साथ त्यामुळे त्यांनी उपसरपंच आणि केज बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही उल्लेखनीय काम केलं आहे. ग्रामपंचायतीत केलेलं काम आणि स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे.
संतोष देशमुखांचं कुटुंब पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतणार
सरपंच देशमुख यांनी मस्साजोगचं दोनदा सरपंच म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहेत तसेच अश्विनी देशमुख सुद्धा एकदा सरपंच पदाचा अनुभव राहिला आहे.
कुटुंबामध्ये राजकारणाचा चांगला अनुभव असल्यामुळे अश्विनी देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावा असं देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कुटूंबाची इच्छा आहे तत्यांनी माध्यमांसमोर बोलून सुद्धा दाखवलं आहे.
मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार
देशमुखांची हत्या आणि राहिलेला १८ महिन्याचा कालावधी म्हणून मस्सजोगमध्ये पुन्हा निवडणुकीचं वारं फिरलं आहे. धनंजय देशमुखांच्या माहिती नुसार अश्विनी देशमुख निवडणूक लढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. माध्यमांसमोर दिलेल्या माहितीनुसार निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची आणि गावकऱ्यांची मागणी आहे.
मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे पाहणे उत्सुकांचे राहणार आहे.
बीड : बीडमधील गाजलेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला दीड वर्ष उलटले असून, आता मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी निमित्ताने हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. संतोष देखमुख हत्या प्रकरणाने दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. आता मस्साजोगच्या ग्रामपंचायतीचं बिजुल वाजलंय. सरपंच देशमुखांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी देशमुखांची पत्नी माजी सरपंच अश्विनी देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
माजी सरपंच संतोष देशमुखांची गेल्या दीड वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती, त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. बीडमधील अनेक तालुक्यांमुळे दहशतीचे वातावरण तयार झाले होते, देशमुखांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. अनेक मराठा संघटना एकत्र येऊन जागोजागी देशमुखांच्या हत्येचे आरोपी पकडण्यासाठी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरले होते. प्रामुख्याने धनंजय मुंडेंच्या विश्वासू मानले जाणाऱ्या वाल्मिक कराडसह आठ जणांवर आरोप लावण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तथापि त्यांच्यापैकी आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे.
असा राहिला आहे अश्विनी देशमुखांचा राजकीय प्रवास
देशमुखांच्या पत्नी यापूर्वीदेखील सरपंच राहिल्या आहेत. अश्विनी २०१७ ते २०२२ या काळात मस्साजोगच्या सरपंच राहिल्या आहेत. प्रामुख्याने पतीची मदत आणि भाजपची साथ त्यामुळे त्यांनी उपसरपंच आणि केज बाजार समितीच्या सदस्य म्हणूनही उल्लेखनीय काम केलं आहे. ग्रामपंचायतीत केलेलं काम आणि स्वच्छ प्रतिमा अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे.
संतोष देशमुखांचं कुटुंब पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतणार ?
सरपंच देशमुख यांनी मस्साजोगचं दोनदा सरपंच म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. तसेच अश्विनी देशमुखसुद्धा एकदा सरपंचपदाचा अनुभव राहिला आहे. कुटुंबामध्ये राजकारणाचा चांगला अनुभव असल्यामुळे अश्विनी देशमुखांनी पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, असं देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कुटुंबाची इच्छा आहे. त्यांनी माध्यमांसमोर बोलून सुद्धा दाखवलं आहे.
मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार ?
देशमुखांची हत्या आणि राहिलेला १८ महिन्याचा कालावधी म्हणून मस्सजोगमध्ये पुन्हा निवडणुकीचं वारं वाहत आहे. धनंजय देशमुखांच्या माहितीनुसार अश्विनी देशमुख निवडणूक लढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. माध्यमांसमोर दिलेल्या माहितीनुसार निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी त्यांची आणि गावकऱ्यांची मागणी आहे. मस्साजोगची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.