Sanju Samson Wankhede Stadium Record:वानखेडेवर सॅमसनने रचला इतिहास! मुंबईच्या गोलंदाजांना रडवलं, मोडले अनेक रेकॉर्ड्स

संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्समधील हा पहिलाच हंगाम असून, त्याने पहिल्याच सत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

Sanju Samson Wankhede Stadium Record:वानखेडेवर सॅमसनने रचला इतिहास! मुंबईच्या गोलंदाजांना रडवलं, मोडले अनेक रेकॉर्ड्स

मुंबई: वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना संजू सॅमसन याने अक्षरशः धडाकेबाज कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध केवळ 54 चेंडूंमध्ये नाबाद 101 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या शतकीय खेळीच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 207 धावांचा भक्कम डोंगर उभा केला.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संघातील दिग्गज फलंदाज अपयशी ठरले आणि फक्त सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हेच दोन फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकले. अखेर संपूर्ण संघ अवघ्या 104 धावांवर बाद झाला.

संजू सॅमसनसाठी चेन्नई सुपर किंग्समधील हा पहिलाच हंगाम असून, त्याने पहिल्याच सत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तो चेन्नईकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळणाऱ्या या दोन यशस्वी संघांमध्ये अशी कामगिरी यापूर्वी कुणालाही साधता आली नव्हती.

या सामन्यातील शानदार कामगिरीबद्दल संजू सॅमसनला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच तो आयपीएलच्या एका हंगामात एकापेक्षा अधिक शतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने 11 एप्रिल 2026 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नाबाद 115 धावांची खेळी केली होती.

हेही वाचा: Navi Mumbai Cab Fare: रिक्षा, कॅबपेक्षा विमानप्रवास परवडला म्हणायची वेळ! नवी मुंबई विमानतळावरून घर गाठण्यासाठी मोजावे लागतायत तब्बल 6000 रूपये, आणि…

मुंबईच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरलेल्या दानिश मालेवरला पहिल्याच षटकात अकील होसेनने बाद केले. त्यानंतर क्विंटन डिकॉक शून्यावर माघारी परतला, तर नमन धीरही खाते उघडू शकला नाही. अवघ्या 11 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी 73 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र ही जोडी तुटताच मुंबईचा डाव पुन्हा कोसळला. उर्वरित फलंदाजांना फारशी भर घालता आली नाही आणि संघ अवघ्या 20 धावा वाढवून संपूर्णपणे बाद झाला. चेन्नईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकवला.

एकूणच, संजू सॅमसनच्या झंझावाती शतकासह अकील होसेनच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना आयपीएलच्या इतिहासात लक्षात राहणाऱ्या संस्मरणीय कामगिरींपैकी एक ठरला आहे. 

हेही वाचा: Donald Trump: ‘आधी चुकायचं आणि मग झुकायचं’; भारताविरोधातील ‘त्या’ विधानावर ट्रम्प यांची सारवासारव, म्हणाले ‘भारत हा…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number