Shambhavi Pathak Funeral : पायलट शांभवी पाठक यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार; कुटुंबियांचा टाहो

शांभवी पाठक यांचे भाऊ वरुण यांनी चितेला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित नातेवाईक, हवाई दलाचे अधिकारी आणि मित्रपरिवाराच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.<br/>

Shambhavi Pathak Funeral : पायलट शांभवी पाठक यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार; कुटुंबियांचा टाहो

Shambhavi Pathak Funeral : बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या तरुण पायलट शांभवी पाठक (वय 25 वर्षे) यांच्यावर आज दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शांभवी पाठक यांचे भाऊ वरुण यांनी चितेला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित नातेवाईक, हवाई दलाचे अधिकारी आणि मित्रपरिवाराच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.

सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये दुःखाची लाट
गुरुवारी जेव्हा शांभवी यांचे पार्थिव दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह येथील त्यांच्या निवासस्थानी आणले गेले, तेव्हा संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. ज्या घरात नवीन सुरुवातीची तयारी सुरू होती, तिथे आता केवळ शोक उरला होता. शांभवी यांच्या आठवणींनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे काळीज हेलावले होते.

झेपावण्याचे स्वप्न अर्ध्यावरच खुंटले
शांभवी या एक अत्यंत हुशार आणि जिद्दी वैमानिक होत्या. एअर फोर्स बाल भारती स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्समध्ये पदवी मिळवली होती. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊन त्या 2022 पासून 'व्हीएसआर व्हेंचर्स'मध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याकडे 'फ्रोझन एटीपीएल'सह अनेक महत्त्वाची प्रमाणपत्रे होती, जी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देत होती.

हेही वाचा – Ajit Pawar Death : पवार कुटुंबियांसाठी कठीण क्षण! जड अंतःकरणाने केलं बारामतीत अजितदादांच्या अस्थीचं नीरा नदीत विसर्जन

बारामती अपघाताने होत्याचे नव्हते झाले
बुधवारी महाराष्ट्रातील बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे विमान कोसळले. या भीषण अपघातात शांभवी पाठक यांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघाताने महाराष्ट्रासह दिल्लीतील हवाई दलाच्या वर्तुळातही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून मानवंदना
अंत्यसंस्काराच्या वेळी हवाई दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शांभवी यांच्या कर्तृत्वाला आणि साहसाला आदरांजली वाहिली. एका तरुण आणि होतकरू पायलटच्या अशा जाण्याने नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number