Andhra Pradesh Encounter : एक कोटींचे बक्षीस असलेल्या मोस्ट वॉन्टेड माओवाद्याचा चकमकीत मृत्यू; पत्नीसह सहा माओवाद्यांना कंठस्नान

पहाटे झालेल्या या ऑपरेशनमध्ये एकूण सहा माओवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे डीजीपी हरीश गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.<br/>

Andhra Pradesh Encounter : एक कोटींचे बक्षीस असलेल्या मोस्ट वॉन्टेड माओवाद्याचा चकमकीत मृत्यू; पत्नीसह सहा माओवाद्यांना कंठस्नान

Andhra Pradesh Encounter: आंध्र प्रदेश-तेलंगणा सीमेजवळ सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा असलेला कुख्यात माओवादी नेता माडवी हिडमा याला संपवलं आहे. त्याची पत्नी हेमा हिलाही या चकमकीत जीव गमवावा लागला. पहाटे झालेल्या या ऑपरेशनमध्ये एकूण सहा माओवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे डीजीपी हरीश गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.

पहाटे करण्यात आली धडक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण 6 ते 7 च्या दरम्यान पोलिसांनी आंध्र प्रदेशच्या जंगलात शोधमोहीम राबवली. येथे माओवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या इनपुटवरून सुरक्षा दलांनी परिसर घेरला. त्यावेळी माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरादरम्यान झालेल्या चकमकीत हिडमा, त्याची पत्नी हेमा आणि त्यांच्यासोबत सुरक्षा पुरवणारे आणखी चार माओवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा – राग पडला महागात! आर्मी ऑफिसरला विमानात 'नो एंट्री', करावा लागणार रेल्वेने प्रवास

माडवी हिडमा कोण होता?

माडवी हिडमा हा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पूर्वार्ति गावातील मुरिया आदिवासी समुदायातून येणारा माओवादी होता. बाल संघाच्या माध्यमातून तो माओवादी संघटनेत दाखल झाला. माओवादी शाळेत शिक्षण घेताना त्याने स्थानिक आदिवासींमध्ये आपले विचार पसरवण्यास सुरुवात केली. किशनजी उर्फ भद्राण्णा यांच्या नेतृत्वाखाली तो सशस्त्र पथकात सक्रिय झाला.

हेही वाचा – Delhi Red Fort Bomb Blast : इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यासारखाच… लाल किल्ला बॉम्बस्फोटात नवा खुलासा, मोठी माहिती समोर

इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एकाचा सूत्रधार

हिडमा हा माओवादी संघटनेतील सर्वात भीषण आणि रणनीतिक नेता मानला जात असे. जेगुरुगोंडा फील्ड फोर्सचा कमांडर असताना, नंबला केशव राव यांच्या मार्गदर्शनाखाली हिडमाने चिंतलनार-टेकुमेतला हल्ला केल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात 76 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर हिडमाला माओवादी संघटनेत विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि तो केंद्रीय समितीतील सर्वात तरुण सदस्य म्हणून ओळखला जाऊ लागला.

दरम्यान, सुमारे 25 वर्षांपासून घनदाट जंगलात लपलेला हिडमा सुरक्षा दलांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरला होता. गेल्या आठवड्यातच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री हिडमाच्या आईला भेटले होते आणि त्याच्या आत्मसमर्पणाबाबत चर्चा केली होती. तथापी, आता या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी सीमेवरील जंगल परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र केली असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number