IAF MiG-21 Farewell : 60 वर्षांची सेवा पूर्ण; MiG-21 चं शेवटचं उड्डाण

भारतीय हवाई दलातील सहा दशकांचा अभिमान ठरलेले मिग-21 लढाऊ विमान अखेर निवृत्त झाले. 26 सप्टेंबर रोजी चंदीगड येथे झालेल्या समारंभात या विमानांचा शेवटचा फ्लायपास्ट झाला. 1963 मध्ये दाखल झालेले मिग-21 हे भ

IAF MiG-21 Farewell : 60 वर्षांची सेवा पूर्ण; MiG-21 चं शेवटचं उड्डाण

भारतीय हवाई दलाचे सहा दशकांहून अधिक काळ आधारस्तंभ ठरलेले रशियन निर्मित मिग-21 लढाऊ विमान आता इतिहासजमा होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी चंदीगड येथे होणाऱ्या समारंभात या विमानांचा औपचारिक निरोप घेतला जाईल. 1963 मध्ये याच शहरात पहिले मिग-21 दाखल झाले होते, त्यामुळे या निवृत्तीला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.

या कार्यक्रमात जल तोफांचा सॅल्यूट, फ्लायपास्ट तसेच ‘आकाश गंगा’ पथकाचे सादरीकरण होणार आहे. एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह हे 23 व्या स्क्वॉड्रनमधून शेवटचे उड्डाण करणार आहेत. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा या शेवटच्या महिला वैमानिक म्हणून या विमानाचे उड्डाण करतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि माजी हवाई दल प्रमुखही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – Squadron Leader Priya Sharma : 62 वर्षांच्या सेवेनंतर मिग-21 चा निरोप; स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा रचणार इतिहास 

मिग-21 हे भारताने घेतलेले पहिले सुपरसॉनिक विमान होते. 1965 आणि 1971 मधील भारत-पाक युद्ध, 1999 चा कारगिल संघर्ष आणि 2019 च्या बालाकोट हवाई मोहिमेत या विमानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे याला "देशाचा अभिमान आकाशात नेणारा वारहॉर्स" असे विशेष मानाने संबोधण्यात आले. सहा दशकांच्या प्रवासात एकूण 870 पेक्षा अधिक विमाने हवाई दलात दाखल झाली होती. मात्र, जुन्या झालेल्या या विमानांच्या ताफ्यामुळे अपघातांची मालिका वाढली आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे अखेर मिग-21ची निवृत्ती निश्चित झाली आहे.

हेही वाचा – Gold Investment: सणासुदीच्या काळात सोने खरेदी करत आहात? जाणून घ्या किती कॅरेटचे सोने तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल 

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून स्मरणीय टपाल तिकीट प्रसिद्ध केले जाणार आहे. भारतीय हवाई दलाने सोशल मीडियावर भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, “सहा दशकांची सेवा, शौर्याच्या असंख्य कथा, देशाचा अभिमान वाहणारा वारहॉर्स.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number