वादळी पावसाने घेतला ९० लोकांचा बळी, बिहार, यूपीसह ‘या’ राज्यात पावसाचा हाहाकार

अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आहे. या पावसात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात सर्व मिळून 90 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वादळी पावसाने घेतला ९० लोकांचा बळी, बिहार, यूपीसह ‘या’ राज्यात पावसाचा हाहाकार

नवी दिल्ली : भारतात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार वादळी वारे, विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होतोय. या पावसात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात सर्व मिळून 90 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बिहारात सर्वाधिक 59 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये गुरुवारी झालेल्या वादळी पावसात 11 जिल्ह्यांमध्ये 59 जणांचा मृत्यू झाला. नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक 22 जणांचा मृत्यू झाला असून नगवां गावात एका मंदिरावर पडलेल्या पिंपळाच्या झाडामुळे सहा जण जागीच ठार झाले. भोजपुरमध्ये आई आणि मुलासह पाच जण, सिवानमध्ये चार जणाचा बळी गेला. अनेक जिल्ह्यांत झाडं, भिंती कोसळल्याने मृत्यूच्या घटना घडल्या.

उत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार 
उत्तर प्रदेशात बुधवारी रात्रीपासून गुरुवारपर्यंत झालेल्या वादळी पावसामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला. तसंच गहू आणि आंब्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे गहु सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली असून नुकसानभरपाईसाठी तातडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा –  आधी You Tube वर पाहिलं 'वडिलांची मालमत्ता कशी हस्तांतरित होईल'! नंतर दोन्ही भावांनी केली वडिलांची हत्या

झारखंड, बंगालातही अवकाळी पाऊस; बीएसएफ जवानाचा मृत्यू
झारखंडमधील हजारीबाग येथे वादली पावसातच्या घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये बीएसएफ जवान दीपक कुमार यांच्यावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. ते बिहारच्या जमुई जिल्ह्यातील रहिवासी होते.

हेही वाचा – लग्न 10 दिवसांवर असताना नवरदेवाने ठोकली धूम; सासूबाईला घेऊन पळाला

हिमाचल, उत्तराखंडात बर्फवृष्टी आणि भूस्खलन
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी व पावसामुळे डोंगराळ भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलमधील सफरचंदवर बर्फवृषी झाल्याचा फटका बसला आहे. उत्तराखंडच्या काही भागांत नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number