Ayodhya Dhwajarohan: अयोध्येतील राम मंदिर प्रांगणात आजचा दिवस इतिहासात कोरला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी राम लल्लाचे दर्शन घेतले आणि राम दरबारात विधीवत पूजा केली.
भगवा ध्वज; राम मंदिर पूर्णत्वास गेल्याचे प्रतीक
मंदिराच्या शिखरावर उभारलेला भगवा ध्वज विशेष स्वरूपाचा आहे. सुमारे 10 फूट उंच व 20 फूट लांब असलेला हा काटकोन त्रिकोणी ध्वज भगवान श्रीरामांच्या तेजाचे, शौर्याचे आणि अध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. मंदिराच्या बांधकामाची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याची घोषणा या ध्वजरोहणातून औपचारिकरीत्या करण्यात आली.
हेही वाचा – Senyar Cyclone: पुढील चोवीस तास राहा सतर्क; या राज्यांना चक्रीवादळाचा धोका
अयोध्येत “जय श्री राम” चा गजर
ध्वजारोहणाच्या क्षणी मंदिर प्रांगणात भाविकांचा आनंद उसळला. “जय श्री राम” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. हा ध्वज फडकवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मनःपूर्वक आभार मानतो. अयोध्या नव्या भारताचे प्रतीक बनत आहे. एकेकाळी संकटांनी वेढलेली ही नगरी आज जागतिक उत्सवांची राजधानी बनली आहे.”
#WATCH | Ayodhya Dhwajarohan | Uttar Pradesh CM Yogi Adityanath presents miniature models of the Saffron Flag ceremonially hoisted on the 'shikhar' of Shri Ram Janmbhoomi Mandir and Ram Lalla idol at the temple, to PM Narendra Modi and RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat. (Video:… pic.twitter.com/dYljcoBpts — ANI (@ANI) November 25, 2025
हेही वाचा – Labour Honesty Behavior: मजूरांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद; स्टेशनवर मिळालेली पैशांची बॅग केली परत
हा रामराज्याचा ध्वज – मोहन भागवत
यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही या क्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘हा दिवस अत्यंत पवित्र आहे. असंख्य लोकांनी राम मंदिराचे स्वप्न पाहिले, त्यासाठी संघर्ष केला आणि बलिदान दिले. आज त्यांचा आत्मा शांत झाला असेल. हा रामराज्याचा ध्वज आहे. एकेकाळी अयोध्येत ज्याचे अस्तित्व होते, तो ध्वज आज पुन्हा मंदिराच्या शिखरावर फडकताना पाहणे हे अपार आनंदाचे क्षण आहे. भागवत पुढे म्हणाले, भगवा रंग हा धर्म, धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. राम मंदिरासाठी 500 वर्षे संघर्ष झाला आणि आज त्या संघर्षाचा शेवट पूर्णत्वाने झाला आहे. अयोध्येतील या दिव्य सोहळ्याने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भगवान रामाच्या नगरीत नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.