जागतिक स्तरावर वाढलेले कच्च्या तेलाचे दर, वाहतूक खर्च आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे एफएमसीजी (FMCG) कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे कंपन्या आता उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा किंवा पॅकेटचा आकार कमी करण्याचा पर्याय निवडण्याच्या तयारीत आहेत. देशात महागाईचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. साबण, डिटर्जंट, बिस्किटं, नमकीन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड फूड यांसारख्या अनेक वस्तूंच्या किमती लवकरच वाढू शकतात.
अशातच ग्राहकांना पहिल्या दरवाढीचा फटका बसला आहे. अलीकडे चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्यात आली. चहा आणि कॉफीच्या दरात 2 रुपये वाढ झाली होती. त्यात आता अमूलने दुधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय जाहीर केली आहे. हे नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार असून अमूलने ग्राहकांना धक्का दिला आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्यामुळे आता गोकुळ, मदर्स डेअरी, प्रभात, महानंदा आणि इतर दूधाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ पॅकेजिंगसाठी खर्च वाढत असल्यामुळे करण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान 500 ml अमूल म्हशीचं दूध 37 रुपयांवरून 39 रुपये करण्यात आलं आहे. तर 1 लिटर अमूल गोल्ड दुधाची किंमत 67 रुपयांवरून वाढली असून आता 69 रुपये मोजावे लागणार आहे. तसेच 1 लीटर अमूल टी स्पेशल 63 रुपयावरून 66 रुपय रुपये करण्यात आली आहे. अमूल ताजा आणि शक्ति दूधाच्या किंमतीही वाढ केली आहे. अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे चहा विक्रेत्यांकडून आता चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
Amul ने बढ़ाए दूध के दाम, ₹2 प्रति लीटर बढ़े दाम#Amul #Milk #PriceHike pic.twitter.com/rGhjfVhfxw — CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) May 13, 2026