Teacher Slaps Student: शिक्षिकेने कानशिलात लगावताचं धाडकन कोसळला 6 वर्षांचा चिमुरडा; मृत्यूचा थरार CCTV मध्ये कैद

शहरातील 'वन टाउन' भागातील एका खाजगी शाळेत यूकेजी (UKG) वर्गात शिकणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाचा शिक्षिकेच्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

Teacher Slaps Student: शिक्षिकेने कानशिलात लगावताचं धाडकन कोसळला 6 वर्षांचा चिमुरडा; मृत्यूचा थरार CCTV मध्ये कैद

Teacher Slaps Student: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक अतिशय वेदनादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील 'वन टाउन' भागातील एका खाजगी शाळेत यूकेजी (UKG) वर्गात शिकणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाचा शिक्षिकेच्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. 'लिटल गार्डन्स स्कूल'मध्ये घडलेल्या या दुर्देवी घटनेत प्रणय तेजा असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्ही (CCTV) फुटेज व्हायरल; शिक्षिकेचे अमानुष कृत्य कॅमेऱ्यात कैद

वर्गात घडलेला हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसल्यानुसार, गृहपाठ तपासत असताना शिक्षिकेने अचानक चिमुकल्याचे कपडे खेचून त्याला स्वतःकडे ओढले. घाबरलेला मुलगा रडत विरोध करत असतानाच, शिक्षिकेने त्याच्या कानशिलात जोरदार थप्पड लगावली. या अचानक झालेल्या मारहाणीमुळे आणि प्रचंड धक्क्याने तो मुलगा काही सेकंदातच शिक्षिकेच्या अंगावर कोसळल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली; नातेवाईकांचा आक्रोश

घटनेनंतर तत्काळ बालकाला उपचारासाठी 'किंग जॉर्ज हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकत्र येत दोषी शिक्षिकेवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने केली. चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पूर्णपणे निरोगी होता, आदल्या रात्री आणि सकाळीसुद्धा तो आनंदाने खेळत होता; त्याला कोणताही आजार किंवा त्रास नव्हता.

हेही वाचा – Jalgaon: लग्नासाठी ‘इम्प्रेशन’ पाडायचं म्हणून RPFचा गणवेश! जळगाव रेल्वे स्थानकावर तोतया महिला पोलिसाचा भांडाफोड

पोलीस तपासाला वेग; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

याप्रकरणी विशाखापट्टणम पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करत आहेत. चिमुकल्याचा मृत्यू शिक्षिकेच्या मारहाणीच्या मानसिक व शारीरिक धक्क्याने झाला की अन्य काही वैद्यकीय कारणाने, याचा उलगडा शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number