Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या चरणी भक्तीचा अनोखा नजराणा; पुण्यातील भाविकाकडून 967 ग्रॅमचा चांदीचा मुकुट अर्पण

धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे एका भाविकाने देवीच्या चरणी सुमारे 967 ग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा टोप (मुकुट) भक्तिभावाने अर्पण केला आहे.<br/>

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या चरणी भक्तीचा अनोखा नजराणा; पुण्यातील भाविकाकडून 967 ग्रॅमचा चांदीचा मुकुट अर्पण

Tulja Bhavani Temple : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांकडून विविध वस्तू अर्पण केल्या जातात. याच श्रद्धेतून धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे एका भाविकाने देवीच्या चरणी सुमारे 967 ग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा टोप (मुकुट) भक्तिभावाने अर्पण केला आहे.

हेही वाचा – Pune: पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताना सावधान! तिरंगा रॅलीमुळे फर्ग्युसन रोडसह ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुण्यातील काकडे कुटुंबाकडून कुलधर्म-कुलाचार संपन्न

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील रहिवासी अभिजीत विलास काकडे यांनी आपल्या सहकुटुंबासह तुळजापूर गाठून आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. या धार्मिक दौऱ्यादरम्यान काकडे परिवाराने मंदिरात पारंपरिक पद्धतीने देवीची ओटी भरून सर्व आवश्यक कुलधर्म आणि कुलाचार पार पाडले.

मंदिरात भक्तिमय वातावरण

काकडे कुटुंबीयांनी देवीप्रती असलेली आपली श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 967 ग्रॅम वजनाचा सुंदर चांदीचा मुकुट अर्पण केला. याप्रसंगी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी आणि भाविकांच्या उपस्थितीत हा अर्पण सोहळा पार पडला. भाविकांच्या या दातृत्वामुळे आणि भक्तिभावामुळे मंदिर परिसरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number