Family Man शारिब हाश्मीच्या पत्नीचा कर्करोगाशी लढा; 6 व्यांदा आजाराने गाठले, अभिनेत्याची खंबीर साथ पाहून व्हाल भावूक

या कठीण काळात हाश्मी दांपत्याने एकमेकांना दिलेली साथ समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. नसरीन यांना पहिल्यांदा 2018 मध्ये या आजाराचे निदान झाले होते.

Family Man शारिब हाश्मीच्या पत्नीचा कर्करोगाशी लढा; 6 व्यांदा आजाराने गाठले, अभिनेत्याची खंबीर साथ पाहून व्हाल भावूक

Sharib Hashmi's Wife Battling Oral Cancer : अभिनेता शारिब हाश्मी सध्या वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. 'The Family Man' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याची पत्नी नसरीन गेल्या 8 वर्षांपासून तोंडाच्या कर्करोगाशी (Oral Cancer) अत्यंत धैर्याने झुंज देत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, शारिबच्या पत्नीला आता 6 व्या वेळी त्यांना पुन्हा या कर्करोगाची लागण झाली आहे. गेल्या काही वर्षांत नसरीन यांनी 5 वेळा या जीवघेण्या आजारावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र,  हा कॅन्सर अत्यंत आक्रमक असून तो वारंवार उलटून येतो, ज्यामुळे सध्या त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू आहेत, अशी माहिती शारिबने नुकत्याच एका मुलाखतीत दिली.

शारिब आणि नसरीन यांचे अतूट नाते
या कठीण काळात हाश्मी दांपत्याने एकमेकांना दिलेली साथ समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. नसरीन यांना पहिल्यांदा 2018 मध्ये या आजाराचे निदान झाले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर 5 वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शारिब आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये नसरीनसोबत खंबीरपणे उभा असतो. नसरीन यांनीही शारिबच्या या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्याच्या उपस्थितीमुळेच आपल्याला या आजाराशी लढण्याचे बळ मिळते, असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत.

हेही वाचा – Siddharth Bodke in Scam 3: 'स्कॅम 3' मध्ये मराठी कलाकाराचा डंका! सिद्धार्थ बोडके साकारणार सुब्रतो रॉय यांची भूमिका

शारिबचा व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रवास
शारिब आणि नसरीन यांचा विवाह 27 डिसेंबर 2003 रोजी संपन्न झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शारिबने 'तरला' या बायोपिकमध्ये हुमा कुरेशीसोबत काम केले असून 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा हा अभिनेता सध्या हॉस्पिटल आणि शूटिंग अशा दोन्ही आघाड्यांवर शर्थीने लढा देत आहे.

प्रेरणादायी लढा आणि सदिच्छा
नसरीन यांचा हा प्रवास केवळ वेदनादायी नसून तो जिद्दीचा आणि प्रेमाचाही आहे. कॅन्सर शरीरात पसरलेला असतानाही त्या ज्या धैर्याने सामोरे जात आहेत, त्याचे कौतुक सर्वच स्तरांतून होत आहे. शारिबच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांनी नसरीन यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. संकटाच्या काळात कुटुंब किती महत्त्वाचे असते, हेच या हाश्मी दांपत्याच्या संघर्षातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – Raqesh Bapat-Tejashri Pradhan: राकेश बापट आणि तेजश्री प्रधान लग्न करणार? व्हायरल बातम्यांनंतर बहिणीने सगळं सांगितलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number