संशयातून आईची मुलाकडून हत्या

गोंदिया, ०८ जून, २०२३, प्रतिनिधी : गोंदियामध्ये मुलाने आपल्याच आईच्या चरित्रावर संशय घेत तिची हत्त्या केली आहे. जन्म देणाऱ्या आईचा खुन केल्या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी मुलाने आईची हत्या करून स्वतःलाही जखमी केले आहे. मृत स्त्रीचे नाव संध्या कोरे असे आहे. संध्या या आमगाव रोडवरील खालसा ढाब्यावर कॅशियर म्हणून काम करत […]

संशयातून आईची मुलाकडून हत्या

गोंदिया, ०८ जून, २०२३, प्रतिनिधी :

गोंदियामध्ये मुलाने आपल्याच आईच्या चरित्रावर संशय घेत तिची हत्त्या केली आहे. जन्म देणाऱ्या आईचा खुन केल्या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी मुलाने आईची हत्या करून स्वतःलाही जखमी केले आहे.

मृत स्त्रीचे नाव संध्या कोरे असे आहे. संध्या या आमगाव रोडवरील खालसा ढाब्यावर कॅशियर म्हणून काम करत होत्या. यांचा मुलगा करण महेंद्र कोरे (२४) हा नागपुरात एमआरशिप म्हणून कामाला होता. मात्र सहा महिन्यांपासून आई आणि मुलगा श्रीनगर येथील चंद्रशेखर वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. सांध्यांच्या पतीचा २० वर्षांपूर्वी आजारपणाने मृत्यू झाला होता. आरोपी करण कोरेची आई संध्या कोरे हिचा काळ्या जादूवर विश्वास होता. गुप्तधनाचा शोध घेत ती पैसे अंधश्रद्धेवर खर्च करत होती. तसेच, आरोपीला त्याच्या आईच्या चारित्र्यावरही संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होता.

नेमकं काय घडलं ?

घटनेच्या दिवशी दोघेच घरी होते. आरोपी त्या दिवशी आईविषयी मनात राग ठेवून होता. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन – चारच्या दरम्यान घरात असलेल्या धारदार चाकूने आरोपी मुलाने आईचा गळा चिरला. तसेच, रागाच्या भरात तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. मृतदेह स्वयंपाकघरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला तर, आरोपी तरुण सोफ्यावर गंभीर अवस्थेत बसलेला आढळून आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number