Money Laundering Case: महागड्या भेटवस्तू भोवल्या! सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिसवर आता निश्चित होणार आरोप

न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य संशयित सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Money Laundering Case: महागड्या भेटवस्तू भोवल्या! सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिसवर आता निश्चित होणार आरोप

Money Laundering Case: कथित 200 कोटी रुपयांची खंडणी आणि त्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य संशयित सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणाव्यतिरिक्त, कथित 200 कोटी रुपयांच्या खंडणी रॅकेटशी संबंधित 'MCOCA' (मोकोका) प्रकरणातही या सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले जाणार आहेत. या आरोपांच्या औपचारिक स्वाक्षरीसाठी सर्व आरोपींनी 3 जून रोजी न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तुरुंगातून चालवले खंडणीचे रॅकेट 
हे संपूर्ण प्रकरण दिल्ली पोलिसांनी आदिती सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोंदवलेल्या एफआयआरवर (FIR) आधारित आहे. हे प्रकरण 2021 मध्ये सुरू झाले, जेव्हा दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सुकेश चंद्रशेखरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याने 'रॅनबॅक्सी'च्या (Ranbaxy) माजी प्रवर्तकांच्या कुटुंबाची सुमारे 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. तपास यंत्रणांच्या मते, सुकेश चंद्रशेखरने रोहिणी तुरुंगात असतानाच वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट फोन करून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली होती. त्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आणि मनी लाँडरिंगच्या दृष्टीकोनातून चौकशी सुरू केली.

महागड्या भेटवस्तू ठरल्या जॅकलीनसाठी अडचणीच्या
तपासादरम्यान असे उघडकीस आले की, सुकेशने फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर करून अनेक व्यक्तींना आलिशान बॅग्ज, हिऱ्यांचे दागिने, उच्च दर्जाची घड्याळे आणि इतर मौल्यवान वस्तू भेट दिल्या होत्या. या व्यक्तींच्या यादीत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे नाव आघाडीवर होते. ईडीने असा दावा केला आहे की, जॅकलीनला सुकेशकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक फायदे मिळाले होते, ज्यामुळे तिला या प्रकरणात आरोपी म्हणून नावजद करण्यात आले आहे. तथापि, या निधीच्या मूळ स्रोताबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हती आणि आपण स्वतः यात फसवले गेलो आहोत, अशी भूमिका अभिनेत्रीने सुरुवातीपासून न्यायालयात मांडली आहे.

हेही वाचा – June OTT Release: जूनमध्ये ओटीटीवर धमाकेदार चित्रपट आणि सिरीजची मेजवानी, आता घरबसल्या बघा 'Dhurandhar' आणि…

'सरकारी साक्षीदार' बनण्याच्या जॅकलीनच्या याचिकेला ईडीचा विरोध
कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या जॅकलीनने अलीकडेच न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात 'सरकारी साक्षीदार' (Approver) बनून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तथापि, जॅकलीनच्या या भूमिकेवर ईडीने तीव्र आक्षेप घेतला आहे. सध्याच्या घडीला या गुन्ह्याची व्याप्ती पाहता, तिची ही याचिका स्वीकारण्यासाठी कोणताही ठोस कायदेशीर आधार किंवा औचित्य असल्याचे दिसून येत नाही, असे ईडीने स्पष्ट केले आहे. आता 3 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number