नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक

देशात कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दरम्यान दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तुलनेने महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंतेत आता भर पडली आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ […]

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक

देशात कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दरम्यान दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तुलनेने महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंतेत आता भर पडली आहे.

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज तातडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकिमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, चित्रपटगृह, मॉल्स, हॉटेल्स अशा गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंध लागण्याचा निर्णय बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकित नाशिकमध्ये नेमके काय निर्बंध लागतील याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत निर्बंध लागू

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. एका इमारतीमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येणार आहे. तसेच इमारतीच्या एका मजल्यावर कोरोना रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला सील करण्यात येईल तर इमारतीमध्ये १०पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number