काय सांगता! Antilia मध्ये चक्क एकही AC नाही!! मग मुकेश अंबानींचा हा राजवाडा थंड कसा राहतो?

सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेले हे 27 मजली घर केवळ त्याच्या डिझाइन आणि लक्झरी साठीच प्रसिद्ध नाही तर ते कोणत्याही एसी सिस्टीमशिवाय थंड राहते म्हणून देखील प्रसिद्ध आहे.<br/>

काय सांगता! Antilia मध्ये चक्क एकही AC नाही!! मग मुकेश अंबानींचा हा राजवाडा थंड कसा राहतो?
Edited Image

मुंबई: मुकेश आणि नीता अंबानी यांचे घर, अँटिलिया हाऊस, जगातील सर्वात सुंदर घरांच्या यादीत समाविष्ट आहे. 27 मजली अँटिलिया हाऊसमध्ये अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्यांची रचना सर्वांनाच थक्क करते. उदाहरणार्थ, अँटिलियामध्ये एक आईस्क्रीम शॉप, एक बँक्वेट हॉल, एक स्नो रूम, एक थिएटर आणि एक हेलिपॅड देखील आहे. तथापि, आणखी एक गोष्ट आहे जी या घराला खास बनवते. सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेले हे 27 मजली घर केवळ त्याच्या डिझाइन आणि लक्झरी साठीच प्रसिद्ध नाही तर ते कोणत्याही एसी सिस्टीमशिवाय थंड राहते म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

अँटिलियामध्ये सेंट्रल कूलिंग सिस्टमची जादू – 

मुकेश अंबानींच्या घरात अँटिलियामध्ये लक्झरीची कमतरता नाही. तथापि, या सुपर लक्झरी घरात एकही बाहेरचा एसी नाही. ही बाब खरचं खूपच आश्चर्यकारक आहे. अँटिलिया हाऊस अत्याधुनिक सेंट्रल कूलिंग सिस्टमने सुसज्ज आहे. मुंबईच्या कडक उन्हातही बाहेरील एसी युनिटशिवाय अँटिलिया थंड राहते. घरातील संगमरवरी, फुले आणि वनस्पतींसारख्या घटकांचा वापर करून अँटिलाचे तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रित केले जाते. 

एका फॅशन शूट दरम्यान, अभिनेत्री श्रेयधनवंतरीने खुलासा केला की, जेव्हा तिने खोलीचे तापमान वाढवण्याची विनंती केली तेव्हा तिला नकार देण्यात आला. कारण तापमान आधीच सेट केलेले होते. एसी न बसवण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये, घराचा लूक खराब करणे, दुसरे कारण म्हणजे वास्तु, हे देखील एक मोठे कारण मानले जाते. अँटिलियावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि ते अशा गोष्टी, रणनीती आणि इंटीरियर डिझाइन वापरून बनवण्यात आले आहे की, ते एसीशिवायही थंड राहू शकते.

27 व्या मजल्यावर राहते अंबानी कुटुंब – 

अंबानी कुटुंब या संपूर्ण गगनचुंबी इमारतीच्या सर्वात वरच्या 27 व्या मजल्यावर राहते. याचे कारण कोणतेही स्टेटस सिम्बॉल नाही, तर नैसर्गिक प्रकाश आणि ताजी हवा आहे. येथून त्यांना अरबी समुद्राचे दृश्य आणि मुंबईच्या आर्द्रता आणि प्रदूषणापासून शांतता मिळते.

हेही वाचा – अँटिलिया किंवा बुर्ज खलिफा; जाणून घ्या कोणती इमारत आहे सर्वाधिक महाग

अँटिलियामधील स्नो रूम –  

अँटिलियामध्ये बांधलेला स्नोरूम हा सर्वात जास्त चर्चेत असलेल्या भागांपैकी एक आहे. येथे भिंतींवरून बर्फाचे तुकडे पडतात, ज्यामुळे खोलीचे तापमान अत्यंत थंड राहते. हा छंद नाही, तर उष्णतेपासून आराम मिळवण्याचा एक अतिशय अनोखा मार्ग आहे.

हेही वाचा – 24 तासांत बदलले मुकेश अंबानींचे नशीब! एलोन मस्कला मागे टाकून बनले जगातील सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती

अँटिलियामध्ये कोण राहते? 

या आलिशान घरात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश, सून श्लोका, मुलगी ईशा, मुलगा अनंत आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट राहतात. वरचे मजले फक्त कुटुंब आणि विश्वासू कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number