NEETची तयारी करणाऱ्या तरुणीचा बाथरूममध्ये रक्तबंबाळ मृतदेह; पाय बांधले, गळा चिरला अन् डोक्यावर गंभीर वार, नेमकं काय घडलं?

18 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा मृतदेह 20 ऑगस्ट रोजी एका भाड्याच्या खोलीतील बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

NEETची तयारी करणाऱ्या तरुणीचा बाथरूममध्ये रक्तबंबाळ मृतदेह; पाय बांधले, गळा चिरला अन् डोक्यावर गंभीर वार, नेमकं काय घडलं?

Varanasi NEET Student Murder Case: नीट (NEET) आणि एमएससी (M.Sc) ची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी वैद्यकीय अहवालातून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत. 18 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा मृतदेह 20 ऑगस्ट रोजी एका भाड्याच्या खोलीतील बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, तिचे पाय दोरीने बांधण्यात आले होते, गळा चिरण्यात आला होता आणि डोक्यावर प्राणघातक वार करण्यात आले होते. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का, हे तपासण्यासाठी नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (Forensic Lab) पाठवण्यात आले आहेत. वाराणसीमधील रोहनिया भागात ही घटना घडली.

विवाह ठरल्यामुळे आणि 7 गुंठे जमिनीच्या वादातून अपहरण
या हत्येचा मुख्य सूत्रधार मृत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला विवेक चौबे हा असल्याचे तपासात समोर आले आहे. तिचे लग्न ठरले होते आणि तिच्या नावावर 7 गुंठे जमीन होती. तिच्या लग्नाला विरोध असल्यामुळे तसेच जमिनीच्या लालसेपोटी विवेक चौबेने तिला अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने स्वतःच्या भाड्याच्या खोलीवर बोलावले आणि तिचे अपहरण करून अत्यंत क्रूरतेने हत्या केली. आरोपीच्या वडिलांना आणि घरमालकाला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – Crime News: रिक्षाचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये; सोशल मीडियावरील पिस्तूलच्या 'त्या' फोटोने उलगडलं गूढ

हत्येनंतर सीसीटीव्ही बंद; लॅपटॉप आणि मोबाईलच्या आधारे डिजिटल पुराव्यांचा शोध
गुन्हा घडलेल्या इमारतीतील मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरा खराब किंवा जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे, जेणेकरून संशयिताची ओळख पटू नये. पोलिसांनी घटनास्थळावरून तरुणीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला असून डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. फरार आरोपी विवेक चौबेच्या अटकेसाठी पोलिसांनी 8 विशेष पथके तयार केली असून 10 हून अधिक संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू
या घटनेनंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. आरोपी विवेक चौबे हा गेल्या 3 वर्षांपासून मामाकडे राहत होता आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. यावरूनही त्याचे काका अनिल चौबे यांच्याशी त्याचा वाद सुरू होता. वृत्तानुसार, हल्लेखोर अद्याप फरार असून पोलीस त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे मारत आहेत.

हेही वाचा – Nashik Crime : ‘जळालेल्या प्रेताची राख महिलेच्या अंगावर फेकली अन्…’ प्रियकरासोबत लग्नाचं आमिष दाखवून महिलेकडून पैसे उकळले; नाशिक हादरलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number