Crime News: कौटुंबिक कलहातून भयंकर शेवट; पत्नी अन् बहिणीवर गोळ्या झाडून पतीने स्वत:लाही संपवलं

गोमती नगर परिसरात भरदुपारी आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या एका महिला रिलेशनशिप मॅनेजरला तिच्याच पतीने गोळ्या झाडून संपवलं.

Crime News: कौटुंबिक कलहातून भयंकर शेवट; पत्नी अन् बहिणीवर गोळ्या झाडून पतीने स्वत:लाही संपवलं

Crime News:  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका उच्चभ्रू आणि गजबजलेल्या भागात घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. गोमती नगर परिसरात भरदुपारी आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या एका महिला रिलेशनशिप मॅनेजरला तिच्याच पतीने गोळ्या झाडून संपवलं. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर आरोपी पतीने स्वतःच्या घरी जाऊन बहिणीवरही गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतःला गोळी मारून जीवन संपवलं. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे परिसरात कमालीचे भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बँकेतून बाहेर बोलावले अन् झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला दिव्या मिश्रा या गोमती नगर येथील आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास त्यांच्या पतीने त्यांना भेटण्यासाठी बँकेच्या बाहेर बोलावले. सुरुवातीला दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची आणि चर्चा झाली. मात्र, या वादाचे पर्यवसान अचानक भीषण हिंसाचारात झाले आणि पतीने खिशातून पिस्तुल काढून दिव्या यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिव्या यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

घरी पोहोचून बहिणीचा घेतला जीव; स्वतःवरही झाडली गोळी

पत्नीला संपवल्यानंतर संशयित आरोपी पती तातडीने स्वतःच्या घरी परतला. तिथे गेल्यानंतर त्याने कौटुंबिक वादातून स्वतःच्या बहिणीवरही गोळीबार केला, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून टोकाचं पाऊल उचललं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. दिव्या यांच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांकडे मदतीची याचना केली होती.

हेही वाचा – Crime News: वसतिगृहातील कारवाईचा सूड अन् पैशांची हाव; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला 27 वेळा चाकूने वार करून संपवलं

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; पोलीस तपास सुरू

प्राथमिक तपासात या तिहेरी हत्याकांडामागे तीव्र कौटुंबिक वाद असल्याचे समोर येत आहे. पतीने इतके टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली जात आहे. पोलीस प्रशासन प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईकांची चौकशी करून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number