Melody Parle Industries Share: हॅशटॅग ‘Melodi’ ची चर्चा शेअर बाजारात मोठी उसळी! मोदींनी मेलोनींना दिलेल्या गिफ्टमुळे तिसऱ्याचा लाभ

रोम दौऱ्यादरम्यान मोदी यांनी मेलोनी यांना दिलेल्या एका खास भेटीने इंटरनेट अक्षरशः गाजवलं आहे. मोदींनी जॉर्जिया मेलोनींना भेट दिल्यानंतर शेअर बाजारात परिणाम पाहायला मिळाला.

Melody Parle Industries Share: हॅशटॅग ‘Melodi’ ची चर्चा शेअर बाजारात मोठी उसळी! मोदींनी मेलोनींना दिलेल्या गिफ्टमुळे तिसऱ्याचा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण केमिस्ट्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रोम दौऱ्यादरम्यान मोदी यांनी मेलोनी यांना दिलेल्या एका खास भेटीने इंटरनेट अक्षरशः गाजवलं आहे. या भेटीत मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘Melody’ चॉकलेटचं पॅकेट भेट दिलं, आणि त्यानंतरचा दोन्ही नेत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत 'Thank you for the gift' असा संदेश लिहिला. व्हिडीओमध्ये मेलोनी आणि मोदी दोघेही हातात ‘Melody’ चॉकलेटचं पॅकेट धरून दिसतात. मेलोनी हसत म्हणतात, 'Prime Minister Modi brought us a gift… a very very good toffee,' त्यावर मोदी 'Melody' असं उत्तर देतात. त्यानंतर दोघांमध्ये हलकाफुलका संवाद आणि हास्य पाहायला मिळतं.

हेही वाचा- PM Modi Fuel Saving Appeal : 'वर्क फ्रॉम होम'बाबत ऐतिहासिक पाऊल; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट बँकेचा प्रतिसाद
नरेंद्र मोदी यांनी मेलोडी चॉकलेट भेट देताच शेअर बाजारात पारले इंडस्ट्रीजचा शेअर आज चर्चेत आला आहे. पारले इंडस्ट्रीजच्या शेअरने मोठी उसळी गाठली आहे. पारले इंडस्ट्रीजचा स्टॉक 5 टक्क्यांनी वाधरला आहे. पारले इंडस्ट्रीज ही ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत आहे. तर पारले प्रोडक्टस ही कंपनी पारले जी बिस्कीट आणि टॉफी शिवाय चॉकलेट, केक, रस्क, स्नॅक्स, ब्रेक फास्ट सीरिअल आणि आटा विक्री करते.

याशिवाय हाइड अँड सीक, क्रॅकजॅक, मोनॅको, किस्मी, मलोडी आण पारले रस्क या उत्पादनांची विक्री करते. पारले कंपनीच्या शेअरला आज अप्पर सर्किट लागलं. मात्र, पारले इंडस्ट्रीज लिमिटेड आणि पारले प्रोडक्टस या दोन वेगळ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचा एकमेकांशी संबंध नाही. मात्र नावांमधील घोळामुळे रिटेल गुंतवणूकदारांनी पारले इंडस्ट्रीजच्या शेअरची खरेदी केली.  

(Disclaimer :  जय महाराष्ट्र वेब साईट आणि चॅनेल या माहितीमध्ये कोणत्याही स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. येथे दिलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक व सामान्य माहितीसाठी आहे. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number