Crime : हॉटेलमध्ये गेली अन् तो आला; 40 मिनिटांनी घडलेल्या प्रकाराने प्रत्येकजण हादरला; रुम नंबर 101 मध्ये ब्युटीशियनसोबत घडलं काय?

इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत एका ब्युटीशियनचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नेमकं घडलं काय त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Crime : हॉटेलमध्ये गेली अन् तो आला;  40 मिनिटांनी घडलेल्या प्रकाराने प्रत्येकजण हादरला; रुम नंबर 101 मध्ये ब्युटीशियनसोबत घडलं काय?

इंदोरमध्ये हॉटेलच्या खोलीत एका ब्युटीशियनचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सोनाली शर्मा असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. सोनाली ही बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली इंदोरमधील एका हॉलेटमध्ये गेली. तिथं तिला काही वेळासाठी खोली क्रमांक 101 देण्यात आला जिथं ती थांबली होती. साधारण दुपारी दोनच्या सुमारास ती त्यात खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.  पोलिस याप्रकरणी दीपक खंडेलवाल या पाईप व्यावसायिकाचा शोध शोध घेत असून सोनाली ही बेशुद्ध पडण्यापूर्वी या व्यक्तीसोबत त्या हॉटेलच्या खोलीत होती.

हेही वाचा-Mumbai Crime : दोघी आल्या अन् 32 तरुणांच्या आयुष्यात घडलं भलतंच; मुंबईतील हादरवणारी घटना

पोलिस तपासात सोनाली ही दीपकच्या आधीच हॉटेलमध्ये पोहोचली होती आणि त्यानंतर साधारण एक तासाने दीपक हा त्या खोलीत गेला.  दीपक हा साधारण 40 मिनिटे त्या खोलीत होता. त्यानंतर तो बाहेर आल्यावर त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सोनाली ही आतमध्ये बेशुद्ध असल्याचं सागितलं आणि तिला त्यानंतर रुग्णालयात नेलं.

मृत्यू नेमका कशामुळे झाला?
प्राथमिक तपासात सोनालीचा मृत्यू हा गळफासामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट होईल.

हेही वाचा-CRIME : 'लेकरं माझी गेली गं'! एकाच चितेवर जुळ्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार; फरशीवरील 'ती' गोष्ट ठरली मृत्यूचं कारण

सीसीटीव्हीमधून सत्य उघड?
याच दरम्यान, पोलिसांनी त्या दिवशीचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. ज्या फुटेजमध्ये सोनालीला कारमधून रुग्णालयात नेताना दिसत आहे. मात्र खोलीत नेमकं काय घडलं होतं, याचा तपास सुरु आहे. दुसरीकडे पोलिसांकून दीपकचा शोध घेण्यात येत असून, त्याची चौकशी झाल्यावरच या प्रकरणातील अनेक प्रश्नांची सर्व उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number