नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.. मात्र कोविडमुक्त गावांमधील शाळा सुरू करण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील १ हजार २४ शाळांपैकी ३३५ कोविडमुक्त गावातील २९६ शाळा आज सुरू झाल्या आहेत. ८वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू झालेत. त्रंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील […]

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय.. मात्र कोविडमुक्त गावांमधील शाळा सुरू करण्याची प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील १ हजार २४ शाळांपैकी ३३५ कोविडमुक्त गावातील २९६ शाळा आज सुरू झाल्या आहेत.

८वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू झालेत. त्रंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील सोनाई माध्यमिक विद्यालयात आलेल्या विध्यार्थ्यांना फुल देऊन स्वागत करण्यात आले, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला. दरम्यान प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही शाळा सुरू करतोय अशी प्रतिक्रिया शाळेतील मुख्याध्यापक यांनी दिली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number