Crime News: लग्नाला अवघे 4 महिने अन् पोटात 3 महिन्यांचं बाळ… संरक्षण मंत्रालयातील गरोदर ASO ने उचललं टोकाचं पाऊल

नाझिया खानम असे मृत महिलेचे नाव असून, 21 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा मृतदेह राहत्या घरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.<br/>

Crime News: लग्नाला अवघे 4 महिने अन् पोटात 3 महिन्यांचं बाळ… संरक्षण मंत्रालयातील गरोदर ASO ने उचललं टोकाचं पाऊल

Crime News: देशाच्या संरक्षण मंत्रालयात 'असिस्टंट सेक्शन ऑफिसर' (ASO) म्हणून कार्यरत असलेल्या 30 वर्षीय उच्चशिक्षित महिला अधिकाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैऋत्य दिल्लीतील द्वारका सेक्टर-23 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरथल गावात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाझिया खानम असे मृत महिलेचे नाव असून, 21 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा मृतदेह राहत्या घरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

पहाटे मिळाला कॉल; दंडाधिकाऱ्यांसमोर पालकांचे गंभीर आरोप
21 ऑगस्ट रोजी पहाटे 4:21 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला (PCR) घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात पाठवला. नाझिया यांचा विवाह अवघ्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजेच 11 एप्रिल रोजी मोहम्मद आझम अली खान याच्याशी झाला होता. सुरुवातीला पालकांनी कोणताही आरोप केला नव्हता; मात्र 22 ऑगस्ट रोजी नाझियाच्या पालकांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (SDM) नवीन जबाब नोंदवत सासरच्या मंडळींविरोधात अत्यंत गंभीर तक्रार दाखल केली.

3 महिन्यांची गरोदर; पतीसह सासू-सासऱ्यांवर छळाचा गुन्हा दाखल
नाझियाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नाझियाचा पती मोहम्मद आझम अली खान, सासू समीमुन निशा आणि सासरे बाबर अली खान यांच्याकडून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तिला मारहाण करून धमकावले जात असे. विशेष म्हणजे नाझिया 3 महिन्यांची गरोदर होती आणि तिने फोनवरून आपल्या कुटुंबीयांना या छळाबाबत कल्पना दिली होती. या तक्रारीवरून द्वारका सेक्टर-23 पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात हुंडाबळी व छळाचा एफआयआर (FIR) नोंदवला आहे.

हेही वाचा – रेल्वेतील सूटकेसमध्ये सापडले मृत महिलेचे सडलेले आणि डोके नसलेले अवशेष! भयंकर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट

घटनेपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद; पोलिसांकडून सखोल तपास सुरू
दुसरीकडे, नाझियाच्या पतीने चौकशीदरम्यान सांगितले की, आत्महत्येपूर्वी त्यांच्यात तीव्र वाद झाला होता. वादानंतर नाझियाने त्याला एका खोलीत बाहेरून बंद केले आणि ती स्वतः दुसऱ्या खोलीत निघून गेली. त्यानंतर घरमालकाच्या मदतीने तो खोलीबाहेर पडला असता तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. सध्या दिल्ली पोलीस सर्व बाजूंचा विचार करून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या गरोदर महिलेने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number