Ramesh Mhatre Arrest: डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 24 तासांनंतर अटक

सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात प्रवेश करत डॉक्टर्स आणि परिचारिकांना धक्काबुक्की व मारहाण केली.

Ramesh Mhatre Arrest: डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी अपडेट; शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना 24 तासांनंतर अटक

Ramesh Mhatre Arrest: डोंबिवली येथील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात प्रवेश करत डॉक्टर्स आणि परिचारिकांना धक्काबुक्की व मारहाण केली. हा सर्व थरार रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत डॉक्टर वैभव साळुंखे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती.

फरार म्हात्रे अखेर जेरबंद; न्यायालयात होणार हजर
दरम्यान, मंगळवारी रात्री विष्णुनगर पोलिसांनी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या 4 समर्थकांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यापूर्वीच 3 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या, मात्र मुख्य आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी घटनेच्या 24 तासांनंतर रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे. त्याला गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं होतं रुग्णालयात?
रमेश म्हात्रे यांच्या प्रभागातील एका गरोदर महिला रुग्णाला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, जन्मानंतर बाळाला तातडीने NICU (नवजात अतिदक्षता विभाग) उपचारांची गरज भासू शकते, असे नातेवाईकांना सांगितले. मात्र रुग्णालयातील सर्व NICU बेड्स आधीच पूर्ण भरलेले असल्याने, बाळाच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून चिडलेल्या रमेश म्हात्रेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात येऊन 2 डॉक्टर आणि 2 परिचारिकांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – Eknath Shinde Meets Sharad Pawar: शरद पवार प्रदीर्घ काळानंतर विधानभवनात; कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे थेट भेटीला

आरोपी म्हात्रेचा पत्रकार परिषदेत अजब दावा
या प्रकरणावर चौफेर टीका झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला व घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. मात्र, स्वतःचा बचाव करताना म्हात्रे म्हणाले, "मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. CCTV फुटेजमध्ये कॅमेऱ्याच्या कोनामुळे तसे भासत आहे. आम्ही चर्चा करत असताना त्या महिला डॉक्टर सतत मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होत्या आणि आमचे म्हणणे ऐकून घेत नव्हत्या, त्यामुळे मी केवळ त्यांच्या हातावर फटका मारला होता."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number