Crime News : भयंकर! अनैतिक संबंध अन् संपत्तीची हाव; प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीसह 4 वर्षांच्या चिमुरड्याचा काढला काटा

26 वर्षीय हरिणीने तिच्या विनय नावाच्या कथित प्रियकराच्या मदतीने 35 वर्षीय पती अभिनंदन याला संपवलं.

Crime News : भयंकर! अनैतिक संबंध अन् संपत्तीची हाव; प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीसह 4 वर्षांच्या चिमुरड्याचा काढला काटा

Crime News :  बंगळुरू येथील चिक्कबनवरा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. 26 वर्षीय हरिणीने तिच्या विनय नावाच्या कथित प्रियकराच्या मदतीने 35 वर्षीय पती अभिनंदन याला संपवलं. पतीच्या मृत्यूचा साक्षीदार ठरल्याने, स्वतःच्या 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलालाही (यदुवीर) तिने गळा दाबून संपवलं. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी हरिणीला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे. कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध आणि पतीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बळकावणे हे या गुन्ह्यामागील मुख्य कारण असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस यंत्रणेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न
सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास हरिणीने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पती आणि मुलगा घरात निपचित पडल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना दोघेही मृत आढळले. वडिलांनी मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे, असा बनाव रचण्यासाठी आरोपींनी अभिनंदनचा मृतदेह मुलाच्या मृतदेहावर ठेवला होता. परंतु, हरिणीच्या विसंगत जबाबात आणि घटनास्थळावरील पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तब्बल 6 तास कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.

पुरावे नष्ट करण्याचे कारस्थान आणि तपासातील महत्त्वाचे धागेदारे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजता हरिणीने विनयला घरी बोलावले होते. त्यापूर्वी रात्री 10 वाजताच घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते. हत्येनंतर रक्ताचे डाग असलेले कपडे धुऊन वाळत ठेवण्यात आले होते, तसेच मोबाईलमधील कॉल हिस्ट्री, मेसेज आणि फोटो डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला.

हेही वाचा – Nashik Crime : प्रेमाचा त्रिकोण! लिव्ह – इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरला बॉयफ्रेंडच्या मदतीने संपवलं; 18 तास मृतदेह घरात ठेवल्यानंतर कसारा घाटात फेकून दिला…

कोट्यवधींच्या मालमत्तेवर डोळा
मृत अभिनंदन हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या नावावर चिक्कबनवरा येथील तीन मजली इमारतीसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती. अभिनंदनच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता हस्तगत करता येईल, या उद्देशानेच हा कट रचण्यात आल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोघांमधील वैवाहिक वाद आणि तीन महिन्यांपूर्वी हरिणी घर सोडून गेल्याच्या घटनांमुळे कुटुंबात आधीपासूनच तणाव होता. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number