Couple Jumps in Godavari: हृदयद्रावक घटना! 3 वर्षांच्या चिमुरड्याला अंधारात पुलावर सोडून दाम्पत्याची गोदावरीत उडी

निष्पाप बालक &quotअम्मा... नाना...&quot म्हणत धाय मोकलून रडत असताना तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष त्याच्याकडे गेले.

Couple Jumps in Godavari: हृदयद्रावक घटना! 3 वर्षांच्या चिमुरड्याला अंधारात पुलावर सोडून दाम्पत्याची गोदावरीत उडी

Couple Jumps in Godavari: आपल्या पोटच्या गोळ्यासाठी कोणतेही माता-पिता जगाशी संघर्ष करायला तयार होतात; परंतु आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा चिंचिनाडा येथील वशिष्ठ गोदावरी पुलावर एका तीन वर्षांच्या लहान मुलाला अंधारात स्कूटरवर एकटे सोडून त्याच्या आई-वडिलांनी नदीच्या उफाळत्या प्रवाहात उडी घेतली. निष्पाप बालक "अम्मा… नाना…" म्हणत धाय मोकलून रडत असताना तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष त्याच्याकडे गेले. चिमुरड्याला पुलावर एकाकी पाहून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने स्थानिक पोलिसांना पाचारण केले.

अनाथ झालेल्या बालकाची ओळख पटली; नातेवाईकांकडे सुपूर्द

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रडणाऱ्या बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्या दुर्दैवी आई-वडिलांची ओळख पटली असून, २९ वर्षीय डोडा साई आणि २८ वर्षीय शिरीषा असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही वेलपुरु गावातील रहिवासी होते. गुरुवारी रात्री सुमारे १० च्या सुमारास ते आपल्या तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन दुचाकीने पुलावर आले होते. पोलिसांनी मुलाला आणि स्कूटरला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर बालकाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चिमुरड्याच्या डोक्यावरील छत्र हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा – Dating App Scam: गोड बोलून जाळ्यात अडकवायचं अन्… संभाजीनगरच्या बारमध्ये तरुणांना लाखोंचा चुना; मोठा डेटिंग स्कॅम उघड

कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे घरही विकावे लागले; पोलीस तपास सुरू

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत डोडा साई हे चालक म्हणून काम करत होते. यापूर्वी त्यांनी काही काळ आखाती देशात (गल्फ) देखील नोकरी केली होती. मात्र, गेल्या काही काळापासून ते गंभीर आर्थिक संकटात आणि कर्जाच्या जाळ्यात अडकले होते. वाढत्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना आपले राहते घरही विकावे लागले होते. याच आर्थिक ताणतणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शोधमोहीम तीव्र; नातेवाईकांची चौकशी सुरू

नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने उडी घेतलेल्या जोडप्याचा अजूनही शोध लागलेला नाही. स्थानिक गोताखोर आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने गोदावरी नदीच्या पात्रात शोधमोहीम राबवली जात आहे. केवळ कर्ज हेच या आत्महत्येमागचे मुख्य कारण होते की कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. यासाठी पोलीस नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number