Crime News: भाजप नेत्याच्या सुनेने संपवलं जीवन; पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

पतीचे इतर स्त्रीशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Crime News: भाजप नेत्याच्या सुनेने संपवलं जीवन; पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Crime News: गुजरात राज्यातील सूरत शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. स्थानिक भाजप नेत्या शशी सिंह यांच्या सुनेने सासरच्या घरात गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. पतीचे इतर स्त्रीशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेनंतर पळसाणा परिसरातील कडोदरा भागातील श्रीनिवास सोसायटीत प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीला तात्काळ अटक केली असून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

भावाच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल; पॅनेल पीएमची होती कुटुंबाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव निधी सिंह असे आहे. निधीच्या अकाली आणि संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी निष्पक्ष तपासासाठी निष्णात डॉक्टरांच्या टीममार्फत ‘पॅनेल पोस्टमार्टम’ करण्याची मागणी केली होती. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधीच्या भावाने थेट कडोदरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. पतीने दुसऱ्या स्त्रीसोबत असलेल्या संबंधांमुळे निधीचा छळ केला आणि तिला आत्महत्यूस प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा – Crime News: मॉडेल मुस्कान शर्माला मारण्यापूर्वी इम्रानचे 'इन्स्टाग्राम लाईव्ह'; पोलिसांकडून महत्त्वाचा उलगडा

भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई; पोलीस तपास वेगाने सुरू
निधीच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कडोदरा पोलिसांनी मृत निधीचा पती सौरभ सिंह आणि त्याची कथित प्रेयसी इशा बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जीव देण्यास प्रवृत्त करणे आणि कौटुंबिक छळ यांसारख्या गंभीर कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणातील डिजिटल पुरावे आणि कॉल डिटेल्स एकत्र करत असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने पूर्ण करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number