Crime News: बायकोसोबत प्रेमाने राहतो म्हणून Exगर्लफ्रेंड भडकली; तिने दुसऱ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं कांड!

पतीने दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीपासून सुरू झालेल्या या प्रकरणाचा अंत एका भीषण हत्येने झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News: बायकोसोबत प्रेमाने राहतो म्हणून Exगर्लफ्रेंड भडकली; तिने दुसऱ्या बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं कांड!

Bhopal Goregaon Monu Raikwar Wife Rakhi Murder Case: रोजच्याप्रमाणे सकाळी मोनू रैकवार हा कामावर निघून गेला. घरात त्याची पत्नी राखी दैनंदिन कामांमध्ये व्यग्र होती. मोनू घराबाहेर पडताच त्याच्या आयुष्यात एवढे मोठे संकट येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. मोनूची जुनी प्रेयसी शशी ही तिचा मित्र नरेंद्र याला सोबत घेऊन थेट मोनूच्या घरात घुसली आणि दोघांनी मिळून राखीची निर्घृण हत्या केली.

गळा आवळून हत्या; चादरीत गुंडाळून पडीक घरात लपवला मृतदेह
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, शशीला राखीचे मोनूसोबत राहणे अजिबात सहन होत नव्हते. याच द्वेषातून तिने नरेंद्रच्या मदतीने राखीचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या वेळी शशीने राखीचे तोंड दाबून धरले, तर नरेंद्रने अत्यंत निर्दयीपणे तिचा गळा आवळला. यातच राखीचा जागीच मृत्यू झाला. 23 ऑगस्टला भोपाळमधील रातीबड परिसरातील गोरेगाव येथे ही भयंकर घटना घडली. हत्येनंतर पकडले जाण्याच्या भीतीने दोघांनी मृतदेह एका चादरीत गुंडाळला अन् घराजवळच असलेल्या एका पडक्या घरात लपवून ठेवला. यानंतर आरोपी नरेंद्र थेट इटारसीला पळून गेला.

हेही वाचा – Air India Employee Wife Death: पतीच्या मोबाईलमधील एका फोटोवरून राडा.. तडक दुसऱ्या खोलीत जात उच्चशिक्षित पत्नीने केलं असं..

पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार; 4 दिवसांनंतर उघडकीस आला प्रकार
कामावरून परतल्यानंतर पत्नी घरात न दिसल्याने मोनू अस्वस्थ झाला. त्याने 23 ऑगस्ट रोजीच रातीबड पोलीस ठाण्यात धाव घेत राखी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आसपासचा परिसर पिंजून काढला आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासले, मात्र राखीचा काहीच सुगावा लागला नाही. अखेर 27 ऑगस्टच्या सकाळी गोरेगाव येथील एका ओसाड घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी तिथे शोध घेतला असता राखीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

संशयाची सुई एक्स-गर्लफ्रेंडकडे; पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली
हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयावरून मोनूची माजी प्रेयसी शशी हिची कडक चौकशी केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच शशीने नरेंद्रसोबत मिळून राखीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी शशी आणि नरेंद्र या दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे हजर केले आहे. पतीने दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीपासून सुरू झालेल्या या प्रकरणाचा अंत एका भीषण हत्येने झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Crime News: मॉडेल मुस्कान शर्माला मारण्यापूर्वी इम्रानचे 'इन्स्टाग्राम लाईव्ह'; पोलिसांकडून महत्त्वाचा उलगडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number