Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीला निर्घृणपणे संपवलं; चेहरा विद्रूप करून टोकाचं पाऊल उचलल्याचा बनाव… पण एक चूक अन् डाव पलटला

40 वर्षीय पतीने क्षुल्लक वादातून आपल्या 38 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीला निर्घृणपणे संपवलं; चेहरा विद्रूप करून टोकाचं पाऊल उचलल्याचा बनाव… पण एक चूक अन् डाव पलटला

Wife Death News: एका 40 वर्षीय पतीने क्षुल्लक वादातून आपल्या 38 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर ही आत्महत्या भासवण्यासाठी आरोपीने तिच्या चेहऱ्यावर गरम तेल ओतून चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. गुंजा मद्धेशिया असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी तिचा पती रणजित कुमार गुप्ता याला अटक केली आहे. आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो सुमारे 18 महिन्यांपूर्वी कुटुंबासह बेंगळुरूमध्ये राहण्यास आला होता.

हत्येची पार्श्वभूमी आणि धक्कादायक घटनाक्रम
बेंगळुरू येथील बिलेकहल्ली परिसरात राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये गेल्या 3 महिन्यांपासून किरकोळ कारणांवरून सातत्याने भांडणे होत होती. तसेच पत्नीने फोन न उचलल्याचा राग मनात धरून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. घटना घडली त्या दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास दोन्ही मुले शाळेत गेल्यानंतर आरोपी कामावर जाण्याच्या बहाण्याने निघून पुन्हा घरी परतला. त्यानंतर झालेल्या वादात त्याने पत्नीच्या गळ्यात ओढणी टाकून तिचा गळा आवळून खून केला.

हेही वाचा – CRIME : भाजीवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला; मुलांसमोर पत्नीची गोळी झाडून हत्या; शेजारच्यांना आवाज जाताच पतीने केली हद्दच पार

आत्महत्येचा बनाव आणि पोलिसांचा संशय
हत्या केल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास आरोपीने पुन्हा घरी येऊन कढईत तेल तापवले आणि मृत पत्नीच्या चेहऱ्यावर ओतले. त्यानंतर घर बंद करून तो निघून गेला आणि संध्याकाळी परत आल्यावर पत्नीने आत्महत्या केल्याचे भासवून शेजाऱ्यांना सांगू लागला. रात्री 8 वाजता घरमालकाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास अधिकारी नटराज डीएन आणि त्यांच्या टीमला आरोपीच्या वर्तनावर आणि विधानांवर संशय आल्याने त्यांनी त्याची सखोल चौकशी केली.

पोलिसांचा तपास आणि कारवाईचे महत्त्वाचे मुद्दे
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तपासाशी संबंधित महत्त्वाचे गोष्टींमध्ये कौटुंबिक कलह आणि पत्नीने फोन न उचलल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हत्येनंतर चेहरा जाळून आत्महत्या सिद्ध करण्याचा आरोपीचा प्रयत्न अपुरा राहिल्याने पोलिसांचा संशय बळावला. आरोपी रणजितला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर दाम्पत्याच्या मुलगा आणि मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा – Raigad Crime News: रायगड जिल्हा हादरला! 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून अत्याचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number