Crime News: भयंकर घटना! 6 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचार करून संपवलं, नंतर मृतदेह पोत्यात भरला…; आरोपीचा कारनामा पाहून पोलिसही झाले अवाक्

नराधमाने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.<br/>

Crime News: भयंकर घटना! 6 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचार करून संपवलं, नंतर मृतदेह पोत्यात भरला…; आरोपीचा कारनामा पाहून पोलिसही झाले अवाक्

Crime News: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. 6 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला अत्याचार करून संपवलं. त्यानंतर आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. 'इकोटेक-3' (Ecotech-3) क्षेत्रातील 'टिद्दी पार्क' (Tiddi Park) परिसरात पोलीस आणि आरोपीमध्ये ही चकमक झाली. बलराज ऊर्फ 'बल्ला' (रा. तिलपाटा) असे या आरोपीचे नाव होते. नराधमाने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाला होता क्रूर प्रकार

ही अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना 28 ऑगस्ट रोजी घडली होती. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीला आरोपी बलराजने फुस लावून आपल्यासोबत नेले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवण्यात आलं. मुलीला संपवल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह एका पोत्यात भरला होता. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला होता. हे फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात नागरिकांचा प्रचंड संताप अनावर झाला होता आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात होती.

हेही वाचा – Crime News: भाजप नेत्याच्या सुनेने संपवलं जीवन; पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

पोलीस कर्मचाऱ्यावर केला गोळीबार; प्रत्युत्तरात नराधमाचा अंत

सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडण्यासाठी घेराव घातला होता. मात्र, स्वतःला पोलिसांच्या तावडीत सापडलेले पाहून आरोपी बलराज याने सुटण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या पथकावर थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. आरोपीने केलेल्या या अचानक गोळीबारात रवी यादव नावाचे पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने आणि आत्मरक्षणासाठी केलेल्या प्रत्युत्तरी गोळीबारात आरोपी गोळी लागून जखमी झाला. या चकमकीत पोलीस कर्मचाऱ्याला आणि जखमी आरोपीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number