Paithan News: मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवला, पण अचानक उचललं टोकाचं पाऊल; पैठण तालुक्यातील घटनेने हळहळ

पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथे २६ वर्षीय संकेत पवार याचा घरात मृत्यू झाल्याची घटना समोर आली. नातेवाईक बाहेर गेले असताना हा प्रकार उघडकीस आला असून पाचोड पोलिसांचा तपास सुरू आहे.

Paithan News: मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवला, पण अचानक उचललं टोकाचं पाऊल; पैठण तालुक्यातील घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथे २६ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संकेत लहू पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत पवार हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रविवारी सकाळच्या सुमारास घरातील नातेवाईक काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी संकेत हा घरी एकटाच होता.

दरम्यान, दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शेजारील व्यक्ती काही कामानिमित्त संकेतच्या घरी गेली. त्यावेळी संकेत घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती तातडीने पाचोड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पाचोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून संकेतला तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संकेतला मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान, तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संकेतच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर हर्षी खुर्द परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number