Vaibhav Singh Death : 27 व्या मजल्यावरून पडून PhD च्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; टोकाचं पाऊल, अपघात की घातपात?

27 व्या मजल्यावरून पडण्यापूर्वी काय घडले, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस तांत्रिक पुरावे आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

Vaibhav Singh Death : 27 व्या मजल्यावरून पडून PhD च्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; टोकाचं पाऊल, अपघात की घातपात?

23 Years Old PhD Student Death after Falling from 27th floor: इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचे नाव  वैभव सिंह असून त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह लिफ्टसमोरील मोकळ्या जागेत आढळल्यानंतर संपूर्ण सोसायटीत मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. हा तरुण पीएचडीचा विद्यार्थी असून मागील एका आठवड्यापासून या इमारतीत राहणाऱ्या त्याच्या आत्या आणि काकांकडे राहायला आला होता. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये विजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ विहार परिसरात असलेल्या 'प्रतीक ग्रँड सिटी' सोसायटीत ही घटना  घडली.

राजस्थानचा रहिवासी असलेला वैभव दिल्लीत करत होता पीएचडी
मृत वैभव सिंह हा मूळचा राजस्थान राज्यातील जोधपूर येथील रहिवासी होता. तो दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून पीएचडी (PhD) चे शिक्षण घेत होता. गेल्या सुमारे 1 आठवड्यापासून वैभव सिद्धार्थ विहारमधील प्रतीक ग्रँड सोसायटीत राहणाऱ्या त्याच्या आत्या आणि काकांकडे वास्तव्यास होता. घटनेच्या वेळी त्याचे आत्या-काकादेखील घरातच उपस्थित होते, मात्र वैभव अचानक 27 व्या मजल्यावर कसा गेला आणि तिथून कसा खाली पडला, याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. त्याचा मृतदेह टॉवर C-4 च्या UG (अंडरग्राउंड/अपर ग्राऊंड) फ्लोअरवर लिफ्टसमोरील मोकळ्या जागेत आढळून आला.

हेही वाचा – Crime News: मुलाच्या कारनाम्याने वडील संतापले! घरातून 50 लाख लांबवणाऱ्या मुलाला शोधून आणले अन् थेट..

घटनास्थळी सुसाईड नोट नाही; CCTV फुटेजमध्ये एकटाच पायऱ्यांवरून जाताना दिसला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची कसून पाहणी केली. मात्र, पोलिसांना कोणतीही चिठ्ठी (Suicide Note) सापडलेली नाही. दरम्यान, पोलीस तपासात हाती आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये वैभव एकटाच जिने चढून वरच्या मजल्याकडे जाताना दिसून येत आहे. या घटनेमागे आत्महत्या आहे की अपघात, याबाबत वैभवचे नातेवाईकही काही स्पष्ट सांगू शकलेले नाहीत.

आत्महत्येच्या शक्यतेचाही तपास सुरू
पोलीस सध्या या घटनेचा सर्व अंगांनी तपास करत आहेत. एसीपी उपासना पांडे आणि डीसीपी धवल जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याच्या पालकांना जोधपूर येथे घटनेची माहिती देण्यात आली आहे. 27 व्या मजल्यावरून पडण्यापूर्वी काय घडले, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस तांत्रिक पुरावे आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

हेही वाचा – Crime News: पती-पत्नीमध्ये वाद; दुसऱ्या दिवशी तलावात आढळला आईसह 5 मुलांचा मृतदेह, संशयास्पद मृत्यूने खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number