Chabahar Port: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध टाळण्यासाठी मध्यस्थी केली होती. आता पाकिस्तानने अमेरिकेला भारताजवळील चाबहारजवळ एक बंदर देण्याची ऑफर दिली आहे, ज्यावर अमेरिकेने सहमती दर्शविली आहे.
फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या सल्लागारांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अरबी समुद्राजवळील पासनी येथे बंदर बांधण्याची योजना सादर केली आहे. या योजनेत अमेरिकन गुंतवणूकदारांना अफगाणिस्तान व इराणच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तानमधील पासनीत टर्मिनल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.
अहवालात असेही सांगितले आहे की, या प्रकल्पासाठी पाकिस्तानने अमेरिकेला 1.2 अब्ज डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक ऑफर दिली आहे. या टर्मिनलद्वारे अमेरिका पाकिस्तानच्या महत्त्वाच्या खनिज संसाधनांवर प्रवेश मिळवेल. सप्टेंबरमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधानाने कृषी, तंत्रज्ञान, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांकडून गुंतवणूक मागितली होती.
दरम्यान, ग्वादर बंदर चीनच्या नियंत्रणाखाली असून पासनी ते ग्वादरपासून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे. तर चाबहार बंदरापासून पासनीचे अंतर 300 किलोमीटर आहे. अमेरिकेच्या गुंतवणुकीनंतर पाकिस्तान भू-राजकीय परिस्थिती कशी हाताळतो, हे भविष्यातील चर्चेचा विषय ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.