मध्यवर्ती युद्ध चांगलेच पेटले असून इराणकडून आलेल्या हत्येच्या धमकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाट्यमयरित्या पलायनाचा डाव आखला. इराणच्या धमकीनंतर सुरक्षेचा मार्ग म्हणून डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिन्यात ‘एअर फोर्स वन’ ऐवजी एका गुप्त लष्करी विमानातून तुर्कस्तानमधून अमेरिकेकडे रवाना झाले होते.
इराण युद्ध सुरू असताना ट्रम्प तुर्की दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांना इराणकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यानंतरच त्यांनी सर्वांना चकवा देऊन अमेरिका गाठले होते. सुरुवातीला ट्रम्प अमेरिकेच्या विमानात बसले. तर कोणालाही कसलीच भनक न लागू देता ते विमानाला लागून असलेल्या कंटेनरमध्ये लपले.
यावेळी ते एका दाराने आत गेले आणि दुसऱ्या दारावर एक केटरिंग कंटेनर उंच करून दाराला लागून ठेवण्यात आला होता. त्याच कंटेनरमध्ये लपले. कंटेनर एका ट्रकवर लादण्यात आला आणि त्यानंतर ट्रकमधून प्रवास करताना दुसऱ्या विमानातून त्यांनी तुर्कीतून सुखरूप पलायन केले. तसेच नाटो परिषदेत सहभागी होण्यासाठी ट्रम्प अंकारा (तुर्की) येथे गेले होते. यासाठी त्यांनी कतारचे नवे आणि नुकतेच अपडेट केलेले जेट वापरले. इराणशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चकमा देण्याची रणनीती म्हणून दुसरे विमान वापरण्याचा निर्णय घेतला.