काशी विश्वनाथ धाम प्रकल्प काय आहे?

काशी विश्वनाथ धाम प्रकल्प काय आहे?

काशी विश्वनाथ मंदिराची निर्मिती ५ लाख चौरस फूटाच्या जागेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मंदिरात ७५ हजार भाविकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. तब्बल ३३९ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे गंगा नदीची नव्याने ओळख निर्माण होणार आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीसोबत जोडणार सर्व मार्ग जोडण्याचे काम प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे. त्यामुळे गंगेत स्नान करून भाविकांना काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.

या मंदिराच्या परिसरात मुमुक्ष भवन, ३ प्रवासी सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भाविकांसाठी ४ खरेदी केंद्र, बहुउद्देशीय हॉल, सिटी म्युझियम, वाराणसी गॅलरी अशा सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असेलेले काशी विश्वनाथ धाम हा प्रकल्प ३३९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून दररोज जवळपास २००० मजुरांनी या प्रकल्पासाठी काम केले आहे. काशी विश्वनाथ धाम ५ लाख चौरस फुटांपर्यंत पसरला असून हा धाम तयार करण्यासाठी ४०० इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version