मुंबई-गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींची घोषणा

मुंबई-गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींची घोषणा

  गेली १५ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या दीड वर्षांत पूर्ण होणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत कोकणवासीयांना खुशखबर मिळाली आहे.

  गोव्यातील वेर्णा येथे नितीन गडकरी कार्यक्रमात त्यांनी कोकणवासीयांना खुशखबर दिली आहे. मुंबई गोवा महामार्ग गोवा व महाराष्ट्रासाठी महत्वचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्ता बांधण्यासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या रस्ताचे रखडलेले काम आता पूर्ण होणार असून गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा प्रवास सुखद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  नितीन गडकरी यांनी केलेल्या या घोषणांमुळे कोकणी चाकरनामी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र इंदापूर ते वाकण फाटा रस्त्याची दुरवस्था झाली असून वाकण फाटा ते वडखळ येथील काम सुद्धा जैसे ते आहे. सुकेळी खिंडीमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम अडकले असल्यामुळे या रस्त्याचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्दश ठेकेदारला दिले असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version