पुण्यातील २० ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकर भरती

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २० ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात २२ अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील १६ जणांना निलंबित करण्यात आले असून,संबंधित ग्रामपंचायतींतील २१२ माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींवर प्रशासक असताना अधिकाऱ्यांनी नियम बाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १४ ग्रामसेवक […]

पुण्यातील २० ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकर भरती

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २० ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात २२ अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यातील १६ जणांना निलंबित करण्यात आले असून,संबंधित ग्रामपंचायतींतील २१२ माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतींवर प्रशासक असताना अधिकाऱ्यांनी नियम बाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १४ ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या २० ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी ६५८ जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number