Malad Accident: ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलेटर दाबलं अन् भरधाव कार लोकांना चिरडत पुढे गेली; मालाड अपघाताचा CCTV समोर

मुंबईच्या मालाड येथील अपघाताचा CCTV समोर आला आहे. 30 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता, या अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यु झाला होता.

Malad Accident: ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलेटर दाबलं अन् भरधाव कार लोकांना चिरडत पुढे गेली; मालाड अपघाताचा CCTV समोर

मुंबईच्या मालाड येथील अपघाताचा CCTV समोर आला आहे. 30 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता, या अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. मुंबई, मालाड-पश्चिम भागात एका 70 वर्षीय चालकाच्या भरधाव कारने सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीसह 3 ऑटो रिक्षांना धडक दिल्याची भीषण घटना घडली होती. ही घटना 30 ऑगस्ट रोजी मालाड येथील एस वी रोड, मामलेदार वाडी रोड जंक्शन येथे सायंकाळी 8 वाजता घडली होती. 

हेही वाचा- Nagpur Fire Brigade : नागपुरात इलेक्ट्रिक वाहनाला आग; मदतीला फायर ब्रिगेड धावली, पण बंबात पाणीच नव्हतं? व्हायरल VIDEOमागचं नेमकं सत्य काय?

या अपघातात दुचाकीवर बसलेल्या 34 वर्षीय प्रियंका सात्रा या महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती आणि इतर 5 जण असे 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री 8 च्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदारवाडी – एस. व्ही. रोड जंक्शनवर सिग्नलवर वाहने थांबलेली असताना हा अपघात झाला. संशयित चालक कृष्ण चामणकर (70) यांनी ब्रेकऐवजी चुकीने ॲक्सिलेटर दाबल्याचे पोलिसांना सांगितले.

कार चालकाने आधी भाजी खरेदी करून घरी परतणाऱ्या सात्रा दाम्पत्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर 3 ऑटो रिक्षांना उडवले. या विनसर गाडीचा क्रमांक MH 02 GJ 2722 हा असून कृष्ण चमणकर ( 70 ) असे वाहनचालकांचे नाव आहे. मालाड पोलिसांनी कारचालक कृष्ण चामणकर यांच्यावर निष्काळजीपणा व भरधाव गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीत चालकाने दारू प्यायली नव्हती, असे समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number