Asia Cup Trophy : सर्व साखरझोपेत असताना स्टेडियममध्ये हायव्होल्टेज ड्रामा! 40मिनिटं ताटकळत ठेवलं, ट्रॉफी वितरणात नक्वीनी तमाशा केलाच

आशिया कपच्या फायनलमध्ये वुमेन्स टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. यावेळी फायनलनंतर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

Asia Cup Trophy : सर्व साखरझोपेत असताना स्टेडियममध्ये हायव्होल्टेज ड्रामा! 40मिनिटं ताटकळत ठेवलं, ट्रॉफी वितरणात नक्वीनी तमाशा केलाच

आशिया कपच्या फायनलमध्ये वुमेन्स टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. यावेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियातील खेळाडूंनी 72 धावांनी श्रीलंकेचा परभाव करत 10 पैकी 8 व्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र ठरल्याप्रमाणे यावेळेस देखील फायनलनंतर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि ट्रॉफी चोर मोहसिन नक्वीच्या हातून टीम इंडियाने ट्रॉफी स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला.

गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय मेन्स संघाने देखील नक्वी यांच्याकडून मेडल आणि ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. ती ट्रॉफी आजही ACC च्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी स्विकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता दुबईच्या स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. 

हेही वाचा- BCCI Announced Team India A: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, यंदा कर्णधारपद कोणाकडे?

बीसीसीआयने एसीसीच्या अधिकाऱ्यांना आधीच कळवलं होतं की, जर मोहसिन नक्वी समारंभाला उपस्थित राहिले तर भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही. तरी देखील नक्वीने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनसाठी उपस्थिती दर्शविली, त्यामुळे मोहसिन नक्वीने मुद्दामहून तमाशा केल्याचं समोर आलं.  अखेर अधिकृत चषकाशिवायच भारतीय महिलांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला.

भारत-श्रीलंका अंतिम सामन्यात काय घडलं?
भारताने प्रथम फलंदाजी करताना 183 धावांचा डोंगर उभारला. दरम्यान, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘लेडी सेहवाग’ शेफाली वर्मा (68) आणि स्मृती मानधना (59) यांच्या तुफानी अर्धशतकांमुळे भारताने 20 षटकांत 183 धावांचा डोंगर उभारला होता. शेफालीने अवघ्या 24 चेंडूंत आशिया चषकातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही केला.

184 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची फलंदाजी पुरती ढेपाळली. एन. श्री चरणी (4 बळी) आणि दीप्ती शर्मा (3 बळी) यांच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पूर्ण संघ 111 धावांत ऑलआऊट झाला. भारताने 2024 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत श्रीलंकेला धुळ चारली. भारताने अखेर 72 धावांनी विजय मिळवत महिला आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा विजेतेपद पटकावलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number