IPL Auction 2026: आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव का घेतले गेले नाही? तो आता कोणत्या संघाकडून खेळणार?

लिलावात अर्जुनचे नाव पुकारले गेले नाही. यामागचे कारण काय? आणि 2026 च्या आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार?, हे जाणून घेऊया.<br/>
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव का घेतले गेले नाही? तो आता कोणत्या संघाकडून खेळणार?

IPL Auction 2026: जेव्हा जेव्हा आयपीएलचा लिलाव होतो, तेव्हा अर्जुन तेंडुलकरचे नाव चर्चेत येते. कमी किंमत, मर्यादित संधी असूनही अर्जुन कायमच मथळ्यांमध्ये राहिला आहे. मात्र, पुढील हंगामासाठी झालेल्या लिलावात अर्जुनचे नाव पुकारले गेले नाही. यामागचे कारण काय? आणि 2026 च्या आयपीएलमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार?, हे जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्सपासून सुरू झालेला प्रवास

सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून ओळखला जाणारा अर्जुन तेंडुलकरने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेतले होते. 2022 मध्येही मुंबईने त्याला 30 लाख रुपयांना कायम ठेवले. मात्र, या कालावधीत अर्जुनला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत.

अर्जुनचे लिलावात नाव का आले नाही?

यावेळी अर्जुनला कोणत्याही संघाने लिलावात बोलावले नाही, कारण तो ‘रिलीज’ करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे त्याचे नाव लिलावाच्या यादीत समाविष्ट झाले नाही. याच कारणामुळे त्याच्याबाबत संभ्रम निर्माण झाला.

हेही वााच – Mumbai Indians: नीता अंबानींची रणनीती यशस्वी! मुंबईला दोन ट्रॉफी जिंकवणारा खेळाडू अवघ्या 1 कोटीत ताफ्यात, कोण आहे हा स्टार क्रिकेटर?

एलएसजीकडे झाली देवाणघेवाण

रिटेन्शन प्रक्रियेदरम्यान मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला थेट कायम ठेवले नाही, तसेच त्याला मुक्तही केले नाही. परिणामी, मुंबई आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात देवाणघेवाण झाली. लखनौकडून खेळणारा शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला, तर अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्सचा भाग झाला आहे. मुंबई इंडियन्सव्यतिरिक्त दुसऱ्या संघासाठी अर्जुन खेळणार ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा – IPL 2026 Auction: आयपीएल 2026 च्या लिलावात इतिहास घडला; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ठरले सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू

आतापर्यंतचा आयपीएल विक्रम

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 5 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 13 धावा केल्या असून 3 विकेट घेतल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकर 2026 मध्ये कुठल्या संघाकडून खेळणार?

अर्जुन तेंडुलकरला लिलावात न सोडल्यामुळे तो आता लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे. त्यामुळे 2026 च्या आयपीएल हंगामात तो एलएसजीकडून खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. त्याला अंतिम संघात संधी मिळते का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version