Rohit Sharma: रोहित शर्माला खेळण्यापासून रोखलं गेलं? मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील ‘त्या’ खुलाशामुळे क्रिकेट विश्वात खळबळ

फिट असूनही रोहित शर्माला मुद्दाम मैदाबाहेर ठेवले गेले का? असा संशय या व्हिडीओमुळे बळावला आहे.<br/>
Rohit Sharma: रोहित शर्माला खेळण्यापासून रोखलं गेलं? मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील ‘त्या’ खुलाशामुळे क्रिकेट विश्वात खळबळ

Rohit Sharma: आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सची सुमार कामगिरी आणि अंतर्गत वादाच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत. प्ले-ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोटातून आता एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. फिट असूनही रोहित शर्माला मुद्दाम मैदाबाहेर ठेवले गेले का? असा संशय या व्हिडीओमुळे बळावला आहे.

महेला जयवर्धनेचा धक्कादायक खुलासा
मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने याने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी संवाद साधताना रोहितच्या दुखापतीवर भाष्य केले. तो म्हणाला, “हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर रोहित पुनरागमनासाठी खूपच आतुर होता. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असतानाही, संघ व्यवस्थापनाने त्याला अधिक विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.” विशेष म्हणजे, जयवर्धनेने रोहितचा उल्लेख मजेशीरपणे ’39 वर्षांचा म्हातारा’ असा केला, जो चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही.

चाहत्यांचा संताप: हा निर्णय कुणाचा?
रोहित शर्मा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक होता, मग त्याला ‘एक्स्ट्रा वीक’ विश्रांती देण्याचा हट्ट कुणी धरला? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. विशेषतः जेव्हा मुंबई इंडियन्स विजयासाठी झगडत होती, तेव्हा अनुभवी खेळाडूला बाहेर बसवणे संघाच्या अंगाशी आले, असे मत क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

मैदानात उतरताच रोहितने दिले चोख उत्तर
रोहित शर्माला 12 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतरच्या काही सामन्यांत मुंबईने सलामीसाठी अनेक प्रयोग केले, पण ते सर्व अपयशी ठरले. लखनऊविरुद्धच्या सामन्यात रोहितने ज्या तुफानी फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला, त्यावरून तो पूर्णपणे फिट असल्याचे सिद्ध झाले. या खेळीनंतर चाहत्यांनी व्यवस्थापनावर टीका केली असून, रोहितला बाहेर बसवण्याचा निर्णय चुकीचा आणि संघाचे नुकसान करणारा होता, असे म्हटले आहे.

हेही वाचा – CSK Vs DC IPL 2026: संजू सॅमसन नावाचं वादळ घोंगावलं! दिल्लीच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी; CSK चा शानदार विजय

थोडक्यात मुंबई इंडियन्सने स्वतःच हा व्हिडीओ शेअर केला असला तरी, यामुळे रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील ताळमेळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘हिटमॅन’ला मुद्दाम रोखले गेले की हा केवळ सावधगिरीचा उपाय होता, याचे उत्तर आता व्यवस्थापनाला द्यावे लागणार आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version