कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सीमावाद पेटला आहे. याचे पडसाद सोलापुरातही उमटले आहेत.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक परिवहनाच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ , ‘ठाकरे सरकार’ लिहून निषेध केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य व मराठी बांधवांना सीमेवरच गोळ्या घालून मारायला हवं, कर्नाटक सरकारने हे काम केल्यास सरकारच्या पाठीशी राहू’ असं संतापजनक वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील याने केलं होतं.
त्याच्या या वक्तव्यानंतर राज्यात सर्वत्र पडसाद उमटत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.