Vaibhav Sooryavanshi Dedication in Cricket : अंडर 19 वर्ल्ड कप संपल्यानंतर सर्व खेळाडू विश्रांतीच्या मूडमध्ये असताना वैभव मात्र दुसऱ्याच दिवशी सरावासाठी सज्ज झाला होता. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांनी वैभवच्या या क्रिकेटवेडाचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. वर्ल्ड कप संपवून परतल्यावर जेव्हा रोमी भिंडर यांनी त्याला दोन ते तीन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला, तेव्हा वैभवने थेट ‘सर, मला फक्त अर्धा तास पीचवर खेळू द्या’ अशी विनंती केली आणि बॅट उचलून सराव सुरू केला. इतकेच नाही तर, दिवाळीच्या मोठ्या सणातही तो समस्तीपूर येथील आपल्या घरी गेला नव्हता. कुटुंबीयांना सोडून तो केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून मैदान गाजवत होता.
वयाच्या 9 व्या वर्षापासून सुरू झालेला क्रिकेटचा प्रवास
वैभवचा हा थक्क करणारा प्रवास वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षापासून सुरू झाला होता. त्याच्यातील उपजत कौशल्य ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटचे रीतसर ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आणि त्याला पूर्ण पाठिंबा दिला. सुरुवातीला स्थानिक स्तरावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित केल्यानंतर त्याने बिहारच्या स्थानिक संघातून अनेक मोठ्या खेळी खेळल्या. त्याची खरी ओळख तेव्हा झाली जेव्हा त्याची भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आणि त्याने ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध अवघ्या 57 बॉल्समध्ये शानदार शतक ठोकून एका रात्रीत स्टार होण्याचा बहुमान मिळवला.
हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय; मुंबई सोडून ‘या’ शहरात होणार स्थायिक, का घेतला असा निर्णय?
आयपीएल 2026 चा थरार आणि ऑरेंज कॅपवर कब्जा
या अद्भूत कामगिरीनंतर राजस्थान रॉयल्सने वैभववर विश्वास दाखवला आणि तो त्यांच्या ताफ्यात सामील झाला. आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये तर वैभवने लखनौविरुद्ध अवघ्या 38 बॉल्समध्ये 93 धावांची वादळी खेळी करत विरोधी संघाची दाणादाण उडवून दिली. संपूर्ण आयपीएल सीजनमध्ये धावांचा पाऊस पाडत त्याने तब्बल 776 धावा कुटल्या आणि सर्वात तरुण खेळाडू म्हणून ‘ऑरेंज कॅप’वर आपले नाव कोरले. त्याची ही तुफानी फलंदाजी पाहून अख्खे क्रीडाविश्व या 15 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडले आहे.
Dear Cricket Give One Chance — Vaibhav Sooryavansi (@VaibhavSuryaFc) July 2, 2026
दिग्गज बॉलर्सची धुलाई करत सिनियर टीममध्ये स्थान
जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स आणि हेझलवूड यांसारख्या जगातील सर्वात बलाढ्य आणि दिग्गज बॉलर्सचा समाचार घेत वैभवने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची ही अफाट क्षमता पाहून आता त्याची टीम इंडियाच्या सिनियर टीममध्ये निवड करण्यात आली आहे. अत्यंत कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवणारा तो एक स्टार खेळाडू ठरला असून लवकरच तो टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिकृत पदार्पण (Debute) करू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.