IPL 2026 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) पुढील हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. रिटेन्शनची अंतिम तारीख जवळ येत असताना, लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. यावेळीही खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर होणार असून, अबू धाबी हे ठिकाण निश्चित झाले आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.
रिटेन्शन लिस्ट 15 नोव्हेंबरला जाहीर होणार
सर्व 10 संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोणते खेळाडू ठेवायचे आणि कोणते रिलीज करायचे याची यादी सादर करावी लागेल. रिलीज झालेल्या खेळाडूंना मिनी लिलावात पुन्हा संधी मिळणार आहे. या प्रक्रियेतून संघांना अतिरिक्त निधी मिळेल, जो ते नवीन खेळाडू खरेदीसाठी वापरू शकतील.
सलग तिसऱ्यांदा लिलाव भारताबाहेर
या वर्षीचा मिनी लिलाव अबू धाबीमध्ये 15 किंवा 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2023 मध्ये लिलाव दुबईत आणि 2024 मध्ये जेद्दाहमध्ये झाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा IPL लिलाव भारताबाहेर होणार आहे.
रिटेन्शन लिस्टवर सर्वांची नजर
सध्या चाहत्यांचे आणि तज्ञांचे लक्ष रिटेन्शन लिस्टकडे लागले आहे. कोणते स्टार खेळाडू आपल्या संघात कायम राहणार आणि कोणते लिलावात दिसतील, याची उत्सुकता सर्वत्र आहे. मेगा लिलावानंतर आता मिनी लिलावाच्या तयारीला संघांनी वेग दिला आहे. पुढील काही दिवस IPL चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.