England Ashes Series 2025 : रिसॉर्टमध्ये रात्र घालवल्या, खूप मद्यपान केलं…; मालिका पराभवानंतर इंग्लंड संघाच्या व्यवस्थापकाने केला मोठा खुलासा

मैदानावर फ्लॉप ठरलेले इंग्लिश खेळाडू मैदानाबाहेर मात्र सलग सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत पार्ट्या करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
England Ashes Series 2025 : रिसॉर्टमध्ये रात्र घालवल्या, खूप मद्यपान केलं…; मालिका पराभवानंतर इंग्लंड संघाच्या व्यवस्थापकाने केला मोठा खुलासा

England Ashes Series 2025: अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सलग तीन सामने गमावून मालिका हातची घालवणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मैदानावर फ्लॉप ठरलेले इंग्लिश खेळाडू मैदानाबाहेर मात्र सलग सहा दिवस मद्यधुंद अवस्थेत पार्ट्या करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अहवालानुसार, गाब्बा येथे झालेली दुसरी कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ नैराश्य झटकण्यासाठी 'नूसा' (Noosa) या छोट्या शहरात चार दिवसांच्या दौऱ्यावर गेला होता. या सहा दिवसांच्या काळात खेळाडूंनी मर्यादेबाहेर मद्यपान केल्याचे दावे केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी खेळाडूंच्या वर्तनाबाबत तक्रारी आणि अनेक अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

रॉब की यांच्याकडे चौकशीची धुरा

इंग्लंड संघाचे संचालक रॉब की यांनी या आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे. ते म्हणाले की, 'जर तथ्ये खरी असतील, तर हे वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी अशा प्रकारे वागणे अयोग्य आहे. मद्यपान संस्कृती (Drinking Culture) कोणालाही मदत करत नाही आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.' 

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीच्या चाहत्यांचा हिरमोड! 'या' कारणामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार सामना

काय आहेत मुख्य आरोप?

ब्रिस्बेनमधील पराभवानंतर संघाने सलग सहा दिवस मद्यपान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तथापी, चार दिवसांच्या नूसा दौऱ्यात खेळाडूंनी आपली शिस्त पायदळी तुडवल्याचा आरोप आहे. संचालक रॉब की यांच्या मते, जेवणासोबत एक ग्लास वाइन घेणे समजण्यासारखे आहे, मात्र त्यापेक्षा जास्त मद्यपान करणे खेळाडूंच्या लय आणि शिस्तीसाठी घातक आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy Squad: विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघात 'या' दोन खेळाडूंची सरप्राईज एन्ट्री

मैदानातील अपयशानंतर नवा वाद

ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेऊन आधीच अ‍ॅशेसवर नाव कोरले आहे. अशा स्थितीत मैदानावर संघर्ष करणाऱ्या खेळाडूंच्या या 'पार्टी संस्कृती'मुळे इंग्लंडचे चाहते प्रचंड संतप्त झाले आहेत. या चौकशीचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून, दोषी खेळाडूंवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version